Goa Film City  Dainik Gomantak
गोवा

Goa Film City: एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाची फिल्मसिटीसाठी तत्परता; सल्लागार निवडण्याची प्रक्रिया सुरू

लोलये येथील भगवती पठारावर उभारणार फिल्मसिटी

Akshay Nirmale

Goa Film City: एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ने राज्यात 200 एकरात फिल्म सिटी उभारण्याची योजना आखली आहे.

त्यासाठी सल्लागार सेवा देण्यासाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात ईएसजीने तत्परता दाखवली आहे.

लोलये कोमुनिदादने अलीकडेच 250 एकरवर फिल्मसिटीसाठी इंटरेस्ट दाखवला होता. येथे पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझरी सर्व्हिसेससाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया ESG ने सुरू केली आहे.

ईसजीने काढलेल्या निविदेसाठी खाजगी विकासकाची निवड करण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी सल्लागाराची आवश्यकता आहे. जो लोलये येथील भगवती पठारावर 'फिल्म सिटी' विकसित करेल.

सल्लागाराने व्यवहार सल्लागार सेवांचे काम दोन महिन्यांत पूर्ण करणे आणि त्याला दिलेले संपूर्ण काम चार महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

निविदेत दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व काही घडल्यास, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ESG कडे फिल्म सिटीचा गुंतवणूकदार-सह-विकासक असेल.

ईएसजीने काही काळापुर्वीच फिल्मसिटीसाठी 250 एकर जमीन असलेल्या एकल किंवा संयुक्त जमीन मालकांना सहकार्य करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती.

या जाहिरातीनंतर काही आठवड्यांतच लोलियेच्या कम्युनिदादने जाहिरातीला प्रतिसाद दिला होता. फिल्म सिटी प्रकल्पासाठी 250 एकर जमीन देण्याचा ठराव लोलियेत मंजूर करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arshdeep Singh Record: अर्शदीप सिंगचा ऐतिहासिक पराक्रम! टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात मोठी घडामोड! आणखी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कटाचा उलगडा होणार?

Hardik Pandya Wicket: संजू सॅमसनचा शॉट हार्दिकसाठी ठरला अनलकी, 'असा' झाला रन आऊट Video

Minor Girl Kidnapping: कुंक्कळीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची कर्नाटकातून सुटका; चिपळूणचा आरोपी अटकेत, 7 दिवसांची पोलिस कोठडी

Ponda College: कॉलेज कॅम्पसमध्ये नग्न अवस्थेत चालवत होता बाईक, विद्यार्थ्यांनी दिला चोप; फोंड्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT