Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Arrest Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal Arrest: कथित दिल्ली मद्य घोटाळ्याचा पैसा निवडणुकीत वापरला? गोव्यातही चौकशी सुरु

Pramod Yadav

Arvind Kejriwal Arrest

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (दि.22) रात्री नऊच्या सुमारास ईडीकडून अटक करण्यात आली.

ईडीने केजरीवालांना नऊवेळा समन्स पाठवण्यात आले मात्र ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. दहाव्यांदा समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पथकाने त्यांना रात्री अखेर अटक केली.

कथित मद्य घोटाळ्याचा पैसा गोवा विधानसभा निवडणुकीत वापरल्याचा आरोप ईडीने केलाय, याप्रकरणी आता गोव्यात देखील पथकाने चौकशी सुरु केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

उत्पादन शुल्क धोरणातून कमावलेल्या कथित 100 कोटी रुपयांचा काही भाग आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापर केला, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.

आपच्या सर्वेक्षण टीममधील काही स्वयंसेवकांना तब्बल 70 लाख रूपये रोखड स्वरूपात दिले. प्रचारात सहभागी असलेल्या काही लोकांकडे हे पैसे दिले जायचे अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते विजय नायर यांनी ED ला दिली होती.

निवडणूक प्रचारात कथित घोटाळ्याचा पैसा वापरल्याचा आरोप ईडीकडून सातत्याने केला जात आहे. दरम्यान, केजरीवाल यांना अटक केल्यानंतर गोव्यात देखील याप्रकरणी चौकशी सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने तपासादरम्यान गोव्यातील आप उमेदवार आणि नेत्यांचे जबाब नोंदवले होते. तपासातून समोर आलेल्या माहितीनंतर केजरीवालांच्या अडचणीत वाढ झाली.

गोवा निवडणुकीत साऊथ लॉबीकडून 100 कोटी रुपयांची लाच घेण्यात आली होती. लाचेचा पैसा निवडणुकीत वापरण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी ED आता गोव्यात तपास करत आहे. दरम्यान, गोव्यातील आप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेविरोधात निषेध नोंदवला, रवींद्र भवन येथे गोळा झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये आपचे आमदार वेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा देखील उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT