Turtle Conservation Campaign Dainik Gomantak
गोवा

Turtle Conservation Campaign: ध्वनिप्रदूषणातही 67 अंडी सुरक्षित

मोरजीत कासव संवर्धन: दीड हजारांहून जास्त पिल्ले समुद्रात सोडली

गोमन्तक डिजिटल टीम

Turtle Conservation Campaign पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात किनारी भागात ध्वनिप्रदूषण होत आहे. ध्वनिप्रदूषणाचा हा मारा सहन करत सागरी कासवाने यंदा तीन वाडा किनारी भागात तब्बल 67 अंडी घातली आहेत.

ही 67 अंडी किनारी भागात सुरक्षित असून त्यातूनही सुरक्षित पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीड हजारहून जास्त पिल्लांना समुद्रात सोडण्यास वन विभागाला यश आलेले आहे.

पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर किनारी भागात रात्री अपरात्रीही ध्वनिप्रदूषण सुरू आहे.या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे.परंतु त्यात सरकारला शंभर टक्के यश मिळालेले नाही.

मोरजी आणि आश्‍वे या किनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. यंदाही ही मोहीम राबवण्यात आली, मात्र ध्वनि प्रदूषणाच्या तक्रारी वारंवार वाढत होत्या. सागरी कासवावर ध्वनिप्रदूषणाचा परिणाम होत असल्याच्या तक्रारीही वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोचल्या होत्या.

त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेऊन या किनारी भागात कोणत्याही प्रकारचे संगीत वाजवण्यास निर्बंध घातले आहेत. गेल्या वर्षी पूर्ण हंगामात सागरी कासवांनी 52 अंडी घातली होती.

यंदाचा हंगाम अजूनही संपुष्टात आलेला नसला तरीही अजून सागरी कासव किनारी भागात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोरजी किनारी भागात 1997 पासून स्थानिकांच्या सहकार्यातून कासव संवर्धन मोहीम राबवली जात आहे.

2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तेंबवाडा किनारी भागात एकूण 500 चौ. मी.जमीन सागरी कासवांच्या अंड्यांसाठी आरक्षित केली होती. तेव्हापासून ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे.

निर्बंध डावलून संगीत पार्ट्यांना ऊत !

आश्‍वे आणि मोरजी किनाऱ्यांवर सायंकाळी सात नंतर कोणत्याही प्रकारचे विजेचे दिवे किंवा संगीत वाजवण्यास निर्बंध आहेत. परंतु सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत चालणाऱ्या संगीत पार्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आहेत.

पार्श्वभूमीवर वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी कासव संवर्धन मोहिमे अडथळा करणाऱ्यांवर वन अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना दिली होती. त्या सूचनेनुसार नुकताच उपजिल्हाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

कासव संवर्धन मोहीम ही स्थानिक शॅक्स व्यावसायिकांच्या सहकार्यातून राबवली जात आहे. यंदा मोठ्या प्रमाणात कासवांनी अंडी घातलेली आहेत. किनारी भागातील शॅक्स व्यावसायिक कधीच ध्वनी प्रदूषण करत नाहीत. उलट या मोहिमेला सहकार्य करतात. कासव कुठेही जाऊन अंडी घालू शकते.

-पवन मोरजे, पंचायत सदस्य मोरजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT