श्री देवी केळबाई देवस्थान
श्री देवी केळबाई देवस्थानDainik Gomantak

Bicholim News : महाराष्ट्रातील भाविकांनी घेतले देवीचे दर्शन

आजपासून मंदिर पुन्हा बंद : मये केळबाई मंदिरात शुद्धीकरण सोहळा
Published on

डिचोली : मये येथील श्री केळबाई देवीचे मंदिर उघडण्यात आल्यानंतर आज बुधवारी मंदिरात अर्कशुद्धी करण्यात आली. ब्राह्मणांच्या साक्षीत आणि भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी पार पडला. तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी दुपारी देवीच्या मंदिराचा बंद दरवाजा उघडण्यात आला. मंदिर उघडण्यात आल्यानंतर भाविकांमध्ये उत्साह पसरला आहे. यामुळे भाविकांची पावले देवीच्या दर्शनासाठी मंदिरात वळू लागली आहेत.

बुधवारी सकाळपासून दिवसभर मंदिर खुले असल्याने अनेक भाविकांनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. आज ‘रेड्या’च्या जत्रेचा दिवस असल्याने मुंबईसह रत्नागिरी आदी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून भाविक मये गावात आले होते. त्यांनी दर्शन घेवून देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. २९ मार्च रोजी माल्याच्या जत्रेवेळी देवीचे मंदिर बंद होते. यावेळी देवीचे दर्शन घडणार की नाही, त्याबद्दल साशंकता होती. मात्र, आम्हाला दर्शन घडले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील भाविकांनी व्यक्त केली.

श्री देवी केळबाई देवस्थान
Mahalasa Narayani Temple : ‘महालसा नारायणी’चा उद्यापासून जत्रोत्‍सव; अखंड नामस्मरण

नऊ दिवस देऊळ बंद

उद्या गुरुवारपासून परंपरेप्रमाणे श्री केळबाईसह श्री माया केळबाई पंचायतनमधील देवळे नऊ दिवस बंद राहणार आहेत. रेड्याच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवसांपासून नऊ दिवस देवळे बंद ठेवण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीयेला ही देवळे पूर्ववत खुली करण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com