End of the women's reign in South Goa? Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्‍यातील ‘महिलाराज’ संपुष्‍टात

..त्या लोकनियुक्त नव्हे तर सरकारनियुक्त होत्या

दैनिक गोमन्तक

मडगाव : नव्या गोवा विधानसभेत यावेळी दक्षिण गोव्यातून एकही महिला आमदार नसेल. कारण कोणीच महिला निवडून आलेल्या नाहीत. मावळत्या सभागृहात एलिना साल्‍ढाणा या दक्षिण गोव्यातील एकमेव आमदार होत्या. 2012 मध्ये त्या कुठ्ठाळी मतदारसंघातून भाजप (BJP) उमेदवारीवर प्रथम बिनविरोध व नंतर 2017 मध्ये पुन्हा निवडून आल्या होत्या. पहिल्या कार्यकाळात तर त्या मंत्रिपदीही होत्या.

यावेळी कुठ्ठाळीतून एलिना पुन्हा निवडणुकीस (Election) उभ्या होत्या, पण त्या पराभूत झाल्या. निवडणुकीच्या तोंडावर त्या भाजपमधून आम आदमी पक्षात गेल्या होत्या. मात्र त्यांच्या पदरी अपयश आले. सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती, पण त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागला. या दोन्ही महिला पराभूत झाल्याने दक्षिण गोव्यातून कोणीच महिला यावेळी विधानसभेत असणार नाही. उलट उत्तर गोव्यातून (goa) दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात व दिलायला लोबो या तीन महिला असतील. त्यातील दोघी भाजपच्या तर तिसरी काँग्रेसची (Congress) आमदार आहे.

यापूर्वी संघप्रदेश काळात दक्षिण गोव्यातून एलियु मिरांडा यांनी विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. सुलोचना काटकर याही आमदार होत्या, पण त्या लोकनियुक्त नव्हे तर सरकारनियुक्त होत्या. त्यावेळी कोणी महिला आमदार (MLA) नसल्याने सरकारने काटकर तसेच फिलीस फारिया व संगीता परब अशा तिघांची नियुक्ती केली होती. परब यांना राज्यमंत्रीही केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ: '..मुद्दामून असे केले'! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्याचे खळबळजनक वक्तव्य; अय्यरबाबत केले मोठे विधान

Stray Dogs: 'भटक्या कुत्र्यांमुळे पर्यटन घटले'! सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; निर्बीजीकरणच्या अपयशावरती चर्चा

Davorlim Saw Mill Fire: दवर्लीत भीषण आग! सॉ मिल जळून खाक; 50 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

Morjim Beach: मोरजीकिनारी कासवांचे अस्तित्व धोक्यात! रेतीउपशामुळे गंभीर परिणाम; पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त

Nitin Nabin Goa Visit: ‘भाजप’कडून जय्यत तयारी! कसा होणार 'नितीन नवीन' यांचा गोवा दौरा? वाचा सविस्तर..

SCROLL FOR NEXT