Various Development works Going On Through The Scheme Dainik Gomantak
गोवा

Valpoi Employment Scheme: ‘मनरेगा’अंतर्गत सत्तरीत अनेकांना रोजगार

613 कामगारांना लाभ : 43 प्रकल्पांची कार्यपूर्ती; 7 कामे प्रगतिपथावर

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Employment Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो.

सत्तरीत ‘मनरेगा’ अंतर्गत आतापर्यंत 16500 दिवस रोजगार प्राप्त झाला आहे. तसेच 613 कामगारांंचा समावेश आहे.

सत्तरीतील विविध भागात या योजनेंतर्गत 43 प्रकल्पांचे काम करण्यात आले आहे. तर 7 प्रकल्पांचे कामे सुरु आहेत.

तर येणाऱ्या दिवसात 50 विविध विकास कामे मार्गी लागणार आहेत. या योजनेमार्फत गावातील तळी साफ करणे, रस्ता करणे, संरक्षक भिंत बांधणे, नदी, नाले यांची साफ सफाई करणे तसेच इतर विकासकामे राबविली जातात.

‘मनरेगा’मध्ये 100 दिवसांपर्यंत रोजगाराची केंद्र सरकारची हमी आहे व त्यानंतरची रोजगार हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते.

हे सर्व कामकाज पारदर्शी पद्धतीने केले जाते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार देण्याबरोबरच शाश्वत मत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

तळी स्वच्छतेसह रस्त्यांची कामे

 ‘मनरेगा’द्वारे काही दिवसांपूर्वी सार्वडे पंचायत क्षेत्रात अमृत सरोवर योजनेअंतर्गत गावातील तळीच्या स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे. खोतोडा पंचायत क्षेत्रातील नवीन रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला.

केरी पंचायत क्षेत्रातही रस्त्यांची कामे मार्गी लागून मार्ले पंचायतीत तळीच्या कामे झालेली आहे. पर्ये ग्रामपंचायतीत संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. होंड्यात रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT