CM Dr. Pramod Sawant
CM Dr. Pramod Sawant  Dainik gomantak
गोवा

Goa Government : स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी रोजगार योजनेच्या मुदतीत वाढ; मुख्यमंत्री म्हणाले...

दैनिक गोमन्तक

राज्य मंत्रिमंडळाने 1 मार्च 2023 पासून स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांची भरती करण्याच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली आहे. या योजनेचा हा शेवटचा विस्तार असेल, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. (Employment scheme for freedom fighters’ children in Goa)

सध्या फक्त 90 पात्र लाभार्थी आहेत जे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सावंत म्हणाले की, त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात 250 हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची भरती करण्यात आली आहे.

2013-14 च्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी सरकारने 2013 मध्ये योजना तयार केली होती. अधिसूचनेनुसार ही योजना सुरुवातीला 28 फेब्रुवारी 2015 पर्यंत वैध होती परंतु वेळोवेळी ती वाढवण्यात आली. या योजनेचा नवीनतम विस्तार 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध होता. मात्रअ आता यामध्ये बदल करण्यात आले असून या योजनेचची मुदतवाढ करण्यात आली आहे.

“गृह विभागाकडे नोंदणी केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी या योजनेचे सातत्य आवश्यक आहे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे या योजनेची वैधता 1 मार्च 2023 पासून आणखी एका वर्षासाठी वाढवताना गोवा सरकारला आनंद होत आहे,” असे कॅबिनेट परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

SCROLL FOR NEXT