New Year 2022

 

Dainik Gomantak

गोवा

Vasco: नववर्षामुळे वास्को पालिका कार्यालयातील कर्मचारी सुट्टीवर; नागरिकांचा खोळंबा

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वास्कोतील पालिका कार्यालयातील कर्मचारी वर्ग सुट्टीवर गेल्याने आज कार्यालय ओसाड पडले होते. आपल्या वैयक्तिक कामासाठी पालिका कार्यालयात आलेल्या नागरिकांची मात्र पंचाईत झाली.

दैनिक गोमन्तक

Vasco: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वास्कोतील पालिका कार्यालयातील कर्मचारी वर्ग सुट्टीवर गेल्याने आज कार्यालय ओसाड पडले होते. आपल्या वैयक्तिक कामासाठी पालिका कार्यालयात आलेल्या नागरिकांची मात्र पंचाईत झाली.

नाताळच्या (Christmas) सणानंतर नवीन वर्षाची (New Year) चाहूल लागते. सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बहुतेक सरकारी कर्मचारी आपली रजा संपवण्यासाठी वर्षाचे शेवटचे पाच दिवसांची निवड करतात व आपली कार्यालयीन रजा घालून घरी किंवा इतर ठिकाणी मौज मजेसाठी जातात. दरम्यान बहुतेक सरकारी कर्मचारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रजेवर जात असल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होतो. कर्मचारी रजेवर गेलेले काहींना माहीत नसते व त्यांच्या कार्यालयात खेपा फुकट होतात. यात नागरिक वैफल्यग्रस्त होतात होताना दिसतात.

दरम्यान आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने येथील पालिका कार्यालय कर्मचाऱ्यांविना सुनेसुने ओसाड पडले होते. नागरिक आपल्या वैयक्तिक कामासाठी पालिकेत आले त्यांना कार्यालयीन कर्मचारी गायब दिसले. सगळ्या खुर्च्या खाली होत्या तर फाइल्स टेबल वरती कर्मचाऱ्यांची वाट पाहत होत्या असेच चित्र होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सावधान! एसी सर्व्हिसिंगच्या नावाखाली लूट; उत्तर प्रदेशातील दोन भामटे मडगावात जेरबंद

Vasco Fish Market: वास्कोतील नवीन मासळी मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ! पालिकेचा आदेश धाब्यावर; मुख्याधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

Bhandari Samaj: भंडारी समाजातील गट-तट मिटविण्यासाठी घेणार पुढाकार! रूद्रेश्‍वर रथोत्सव समितीच्या अध्यक्षांचे प्रतिपादन

Goa Live News: कळंगुट पोलीस स्थानक ठरले गोव्यातील सर्वोत्तम

Goa Politics: बनावट मतदारयादीचा मडगावात प्रयत्न! कॉंग्रेस नेते आक्रमक; BLA, BLOना निलंबित करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT