Goa Sports News: गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणारे खेळाडू आणि अधिकारी यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य राहील अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धा आयोजन समितीची यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्याचे अध्यक्षपदी क्रीडामंत्र्यांनी भूषविले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक 43 खेळांचा समावेश असून देशभरातील दहा हजाराहून जास्त क्रीडापटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
यजमान या नात्याने गोव्याने खेळाडूंची सुरक्षा व सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली आहे. केवळ खेळाडू आणि अधिकारीच नव्हे, तर सामने पाहण्याचे येणारे प्रेक्षक यांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याचे क्रीडामंत्री गावडे यांनी नमूद केले.
स्पर्धेच्या कालावधीत अभेद्य तटबंदी असलेली सुरक्षा व्यवस्था राखणे, गर्दी टाळण्यासाठी वाहतूक मार्ग मोकळे ठेवणे आणि राज्यातील नागरिकांच्या नियमित दळणवळणास बाधा येऊ नये याकडे अधिक लक्ष पुरविण्याचे बैठकीत ठरले, असे क्रीडामंत्र्यांनी नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.