many side effect of chemical colors Dainik Gomantak
गोवा

भुईपाल येथील सूर्यकांत गावकर यांचा नैसर्गिक रंग बनवण्यावर भर

दुर्मीळ झाडांचेही संवर्धन: भुईपाल सत्तरीतील सूर्यकांत गावकर यांची किमया

दैनिक गोमन्तक

वाळपई: होळी, शिगमोत्सव म्हटले की, बाजारात रंगांना मोठी मागणी असते. पण हे रंग आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात, याची जाणीव कोणालाच नसते. आपण जे रंग एकमेकांच्या अंगावर फेकतो, ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. यावर उपाय म्हणून भुईपाल सत्तरी येथील सूर्यकांत गावकर यांनी नैसर्गिक रंग बनवण्यावर भर दिला आहे.

गेली काही वर्षे जंगलातील फळे, भाज्या, पालेभाज्या, हळद, मका बिया यांपासून ते नैसर्गिक रंग बनवतात. यंदाचा होळी सण जवळ आला असून त्यानिमित्त त्यांनी रंग बनविले आहेत. त्यांना ‘संजीवनी रंग’ असे नाव दिले आहे.

जंगलातील झाडांची पाने, फळे यांचा त्यांनी वापर केला आहे. सूर्यकांत यांना जंगलात फिरण्याची प्रचंड आवड. अशा काळात राजेंद्र केरकर यांच्यासारखे पर्यावरणप्रेमी मित्र भेटल्यामुळे सूर्यकांत यांना दिशा मिळाली. रंगनिर्मितीविषयी सूर्यकांत म्हणाले, मी जंगलात फिरायचो. त्यावेळी जंगली फळे, बिया यामध्ये रंग शोधत होतो. नदीकाठच्या बाजूला असलेली केशरी झाडांच्या बिया रंगासाठी उपयुक्त आहे. याशिवाय हळद, मका, पालक, गाजर, निळी झाडे यांचाही रंगांसाठी वापर केला जातो. हे घटक शरीराला अपायकारक नाहीत. सूर्यकांत गावकर दरवर्षी होळीच्या दरम्यान हा उपक्रम राबवतात. त्यामुळे राज्यभरातून त्यांना प्रतिसाद मिळत आहे.

पर्यावरण रक्षणासाठी कार्यशाळांमधून जागृती

सुरुवातीला तांबडी सुर्ला, विर्डी येथील जंगलात फिरून केशरी फळे गोळा करायचो. या कार्यातून दुर्मीळ झाडे संवर्धित होण्यास मदत झाली. या रंगांना संजीवनी रंग म्हणून ओळख देण्यात आली असून होळीमध्ये अशा रंगांचा वापर करावा, असे आवाहन गावकर यांनी केले आहे. सूर्यकांत गावागावांत जाऊन, कार्यशाळा घेऊन मुलांना, महिलांना मार्गदर्शनही करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT