एल्विस गोम्स Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेस छाननी समितीपासून एल्विस गोम्स दूरच

Goa Congress: समर्थकांत नाराजी: एल्विस म्हणतात, बैठकीचे आमंत्रणच नव्हते..!

दैनिक गोमन्तक

Goa Congress: लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यातील उमेदवार ठरविण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या छाननी समितीने आज मडगाव येथे संभाव्य उमेदवार आणि काँग्रेसचे स्थानिक नेते यांच्याशी चर्चा करण्यासाठी ठेवलेल्या बैठकीपासून माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांना बाहेरच ठेवले.

त्यामुळे एल्विस समर्थकांनी नाराजी व्यक्त करताना काँग्रेस पक्षात लोकशाही पद्धतीने जर उमेदवार ठरविले जातात, तर या बैठकीपासून गोम्स यांना बाहेर का ठेवले? असा प्रश्न केला आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात आज छाननी समितीचे अध्यक्ष व गुजरातचे खासदार मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

सूरज हेगडे आणि शफी परंबिल हे अन्य दोन सदस्य यावेळी हजर होते. त्यांनी संभाव्य उमेदवार आणि नेत्यांशी एकेकट्याला बोलावून चर्चा केली. यात दक्षिण गोव्यातील संभाव्य उमेदवार असलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर व कॅ. विरियातो फर्नांडिस तसेच उत्तर गोव्यातील संभाव्य उमेदवार असलेले माजी खासदार ॲड. रमाकांत खलप, विजय भिके आणि राजन घाटे यांचा समावेश होता.

त्याशिवाय प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दोन्ही आमदार, अन्य संघटनांचे अध्यक्ष यांचा समावेश होता. या बैठकीला हजर राहण्यासाठी आलेले गिरीश चोडणकर यांना विचारले असता बैठकीचे स्वरूप काय आहे आणि त्यात कशी चर्चा होईल याची आपल्याला कल्पना नाही, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस उमेदवारीवर आपला दावा: गोम्स

या बैठकीचे आपल्याला निमंत्रण नव्हते. मात्र, आपला दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवारीवर अजूनही दावा आहे. वेळोवेळी मी माझी इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे, असे एल्विस गोम्स यांनी सांगितले.

ही प्राथमिक स्वरूपाची बैठक असून या बैठकीत जी चर्चा झाली त्याचे सार ही समिती केंद्रीय निवडणूक समितीपुढे मांडणार आहे. या बैठकीत या समितीने संभाव्य उमेदवारांशी चर्चा केली.
- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT