एल्‍वीस गोम्‍स Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मोजक्या नेत्‍यांमुळेच काँग्रेसची पीछेहाट, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज; एल्‍वीस गोम्‍स

Goa Congress: गोव्‍यात काँग्रेस जागेवर आणायची असेल तर या काही मूठभर स्‍थानिक नेत्‍यांवर कडक कारवाई केली पाहिजे - काँग्रेस नेते एल्‍वीस गोम्‍स

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress

गाेव्‍यातील काँग्रेस उमेदवारी जाहीर न होण्‍यामागे काही स्‍थानिक काँग्रेस नेत्‍यांनी घातलेला घोळच कारणीभूत आहे. या अशा नेत्‍यांमुळेच गोव्‍यात काँग्रेस विस्‍कळीत झालेली आहे.

गोव्‍यात काँग्रेस जागेवर आणायची असेल तर या काही मूठभर स्‍थानिक नेत्‍यांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेस नेते एल्‍वीस गोम्‍स यांनी व्‍यक्‍त केली.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात गोम्‍स यांनी काही घणाघाती आरोप केले असून त्‍यांची ही मुलाखत गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या फेसबुक, यू-ट्यूब व इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे. गोमन्‍तचे ब्‍युराे चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत गोम्‍स यांनी गोव्‍यातील काही काँग्रेस नेत्‍यांना पक्षापेक्षा स्‍वत:ची महत्त्वाकांक्षा जास्‍त महत्त्वाची वाटते.‍ त्‍यामुळेच आपला स्‍वार्थ कसा साधला जाईल याकडेच त्‍यांचे लक्ष असते. सध्‍या गोव्‍यातील काँग्रेसमध्‍ये जर विस्‍कळीतपणा आला असेल तर याच काही दोन-तीन नेत्‍यांमुळे, असा आरोप कुणाचेही नाव न घेता केला.

सध्‍या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू असल्‍याने काँग्रेस पक्षश्रेष्‍ठी त्‍यात व्‍यस्‍त आहेत. त्‍यामुळे आता त्‍यांच्‍याकडे तक्रारी घेऊन जाणे ही याेग्‍य वेळ नव्‍हे. मात्र, ज्‍यावेळी मला संधी मिळेल त्‍यावेळी या दाेन-तीन नेत्‍यांचे कारनामे आपण जरूर पक्षश्रेष्‍ठींच्‍या कानावर घालू, असे त्यांनी सांगितले.

कार्लुसना सांभाळता न येणे हे दुर्दैवच

भाजपला कंटाळून वास्‍कोचे माजी आमदार कार्लुस आल्‍मेदा हे काँग्रेस पक्षात आले होते. कार्लुस हे दोन वेळेचे आमदार आणि प्रदीर्घ काळ नगरसेवक म्‍हणून काम केलेले नेते आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे अनुभव आणि समर्थक भरपूर आहेत.

ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना असा नेता काँग्रेस सोडून पुन्‍हा भाजपात जाणे, ही दुर्दैवी बाब आहे.

कार्लुससारख्‍या माणसाला काँग्रेस सांभाळून ठेवू शकली नाही, हेच खरे तर फार मोठे दुर्दैव आहे, असे गोम्‍स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT