Encroachment Goa Dainik Gomantak
गोवा

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

Goa News: बेकायदेशीररित्‍या घरे बांधली आहेत, त्‍या विरोधात सध्‍या गोवा सरकारने जी कारवाई सुरू केली आहे ती फक्‍त तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाची असून डोळ्‍यांना पाणी लावण्‍यापुरतीच अाहे असा आरोप एल्‍विस गाेम्‍स यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Elvis Gomes Alleges Goa Government's Anti-Encroachment Drive is a Mere Eye Wash

मडगाव: सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन जी बेकायदेशीररित्‍या घरे बांधली आहेत, त्‍या विरोधात सध्‍या गोवा सरकारने जी कारवाई सुरू केली आहे ती फक्‍त तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाची असून डोळ्‍यांना पाणी लावण्‍यापुरतीच अाहे असा आरोप एल्‍विस गाेम्‍स यांनी केला. फक्‍त उच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणी गोवा सरकारला नोटीस पाठविल्‍यामुळे आम्‍ही काहीतरी कारवाई करतो, हे दाखविण्‍यापुरताच हा सगळा प्रकार असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

आज प्रसार माध्‍यमांशी बोलताना गोम्‍स यांनी, सरकारी, कोमुनिदाद, नगरपालिका आणि पंचायतींच्‍या मालकींच्‍या जमिनीत जर कुणी बेकायदेशीर बांधकाम केले तर त्‍याला नोटीस न देताही ते पाडण्‍याचा अधिकार संबंधित अधिकारिणीला दिला आहे.

जर अशा बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करायची झाल्‍यास या कायद्याचा उपयोग करून आतापर्यंत ही घरे का पाडली गेली नाहीत, असा सवाल त्‍यांनी केला. ही बेकायदेशीर बांधकामे उभी रहाण्‍यामागे लोकप्रतिनिधीच कारणीभूत आहेत. अशा बांधकामांना संरक्षण मिळावे यासाठी या सरकारने मागच्‍यावेळी भूमिपुत्र कायदाही लागू करण्‍यास पाहिले होते याची आठवण त्‍यांनी करून दिली.

आपली स्‍वत:ची वोट बॅंक तयार करण्‍यासाठी अशा बेकायदेशीर घरांना आजवर राजकारण्‍यांनी अभय दिला आहे. बेकायदेशीर घरांना एका अधिसूचनेद्वारे ईएचआर क्रमांक देण्‍याची तरतूद आहे. बेकायदेशीर घरांवर सरकारला कारवाई करायची इच्‍छा आहे तर ही ईएचआर क्रमांक देणारी अधिसूचना अजून का मागे घेतली जात नाही, असा सवालही त्‍यांनीकेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT