CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: एल्टन धादांत खोटे सांगताहेत, त्यांना भाजपमध्ये कुणी बोलावलेच नाही! फातर्पात मुख्यमंत्र्यांचे स्‍पष्‍टीकरण

CM Pramod Sawant: केपेत होत असलेल्या विकासाचे श्रेय आमदारांनी घेऊ नये. ही कामे कवळेकर यांनी मंजूर करून घेतली होती,असे मुख्यमंत्री म्हणाले.

Sameer Panditrao

मडगाव: केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता हे आपल्‍याला भाजपमध्‍ये आमंत्रण आहे, असे जे सांगतात ते धांदांत खोटे असून डिकॉस्‍ता यांना भाजपात येण्‍याचे कुणीही निमंत्रण दिलेले नाही आणि भाजपाला त्‍यांची गरजही नाही, असे वक्‍तव्‍य मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल फातर्पा येथे झालेल्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात बोलताना केले.

केपे भाजप मंडळाच्या फातर्पा येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटेश्वर संस्थान सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाबू कवळेकर, राज्य सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा अध्यक्ष प्रभाकर गावकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप,

उपाध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई, जि.पं. सदस्य खुशाली वेळीप व शाणू वेळीप, फातर्पाच्या सरपंच मनिषा दिवाकर देसाई, बार्सेचे सरपंच मोहन गावकर, खोलाच्या सरपंच प्रियांका वेळीप यावेळी उपस्थित होत्या. यावेळी प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचा मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते सत्‍कारही करण्‍यात आला. केपेत होत असलेल्या विकासाचे श्रेय आमदारांनी घेऊ नये. ही कामे कवळेकर यांनी मंजूर करून घेतली होती,असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाबू कवळेकर, माजी उपमुख्यमंत्री

केपेे मतदारसंघात शाळा इमारतींची दुरुस्ती, भूमिगत वीजवाहिन्या, विज पुरवठ्यासंबंधीत विविध कामे अशा सर्व विकासकामांचे प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले होते. विद्यमान आमदार त्या विकासकामांच्या शुभारंभाचे नारळ वाढवण्याचे व उद्‍घाटने करण्याचे तेवढे काम करत आहेत. योग्यवेळी आपण यासंदर्भातील कागदपत्रे उघड करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT