Konkan Railway  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway : कोकण रेल्वेचे प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व

विजेवर धावणार रोज 50 गाड्या : इंधनावरील खर्च होणार 100 कोटींनी कमी

दैनिक गोमन्तक

Konkan Railways : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. यापुढे या मार्गावरील प्रवासी गाड्याही विजेवर धावणार आहेत. या मार्गावर विजेवरील प्रवासी रेल्वे सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वेचे प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरू होणार आहे. यामुळे डिझेलवरील खर्चात प्रचंड बचत होईल. तसेच धुरामुळे होणारे प्रदूषणही टाळता येणार आहे.

या मार्गावरून दररोज किमान 50 ते 60 प्रवासी गाड्या धावतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. कोकण रेल्वेच्या या मार्गाचे पूर्णतः विद्युतीकरण झालेले असले तरी सध्या या मार्गावर विजेवरील फक्त मालगाड्याच धावतात. बाळ्ळी येथे कोकण रेल्वेचे सबस्टेशन उभे राहात आहे. या स्टेशनचे काम दोन महिन्यांत होणार आहे.

दोन महिन्यांत प्रत्यक्ष सुरवात : गेल्या सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू होते. चारच महिन्यांपूर्वी ते पूर्णत्वास आले. पण बाळ्ळी येथील सबस्टेशनचे काम अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. तसेच अन्य काही तांत्रिक अडचणी असून त्यांची पूर्तता करण्यात येत असल्याचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले.

सध्या कोकण रेल्वेकडे विजेवर चालणारी इंजिन पुरेशा प्रमाणात नाहीत. ती मिळविण्यासाठी इतर रेल्वे विभागांशी समन्वय सुरू आहे. बाळ्ळीसह कोकण रेल्वे मार्गावर अन्य ठिकाणीही काही नवीन सबस्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. ती बांधून झाल्यावर या मार्गावरील 100 टक्के रेल्वे विजेवर धावतील. रेल्वे विजेवर धावू लागल्यावर कोकण रेल्वेचा इंधनावरील खर्च किमान 100 कोटींनी (दरवर्षी) कमी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT