मागील पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ हळदोणे मतदारसंघामध्ये वीजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत खात्याचे अभियंते म्हणतात की, फिडरमध्ये दोष असल्याने ही समस्या निर्माण होत आहे, तर आमदाराचे मते विघ्नसंतोषी लोकांचे हे कृत्य आहे. कारण कोणतेही असले तरी वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे स्थानिक त्रस्त बनले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, मागील पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ हळदोणा मतदारसंघात खंडित वीज पुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार अॅड. कार्लुस फरेरा यांनी वीज खात्यातील अभियंत्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला कार्यकारी अभियंता नार्वेकर, सहाय्यक अभियंता सावियो फर्नांडिस, कायतानो कार्दोज, कनिष्ठ अभियंता फोंडू भाईप उपस्थित होते.
यावेळी अभियंत्यांकडून हळदोणेला वीज पुरवठा करणाऱ्या थिवी येथील फिडरमध्ये दोष (फॉल्ट) असल्याने तो सतत गरम होत असल्याचे कारण आमदारांना दिले. त्यामुळेच विजेची समस्या निर्माण होत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. हळदोणा-खोर्जुवे केबल स्टेड पुलावर रात्रीच्या वेळी होणारा अंधार याबाबत यावेळी चर्चा झाली.
नव्या कायद्यानुसार सार्वजनिक वीज पुरवठा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी अभियंत्यांची असल्याचेही फेरेरा यांनी सांगितले. यावेळी फेरेरा यांनी मुख्य अभियंत्यांशी फोनवर चर्चा करून समस्येवर तोडगा काढण्याची सूचना त्यांना केली. यावेळी समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन आमदारांना देण्यात आले.
दरम्यान, गणेश चतुर्थी तोंडावर आल्याने हळदोणेतील वीज समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात यावा अशी विनंती करणारे निवेदन खात्याला सादर करण्यात आले.
फेरेरा काय म्हणाले...?
हळदोणे मतदारसंघातील विजेच्या समस्येवर विधानसभेत आवाज उठविल्यापासून हा प्रकार घडत असल्याचे आमदार अॅड. फेरेरा यांनी अभियंत्यांच्या निदर्शनाला आणून दिले. काही विघ्नसंतोषी लोक हे कृत्य करीत असल्याचा दावा फेरेरा यांनी अभियंत्यांसमक्ष केला. या खंडित वीज पुरवठ्यामुळे स्थानिकांवर अंधारात राहण्याची वेळ ओढवली आहे. दिवसांतून बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.