Electricity Office  Dainik Gomantak
गोवा

Curtorim News: कुडतरीतील वीज समस्या सुटणार

Electricity Issue At Curtorim: मोडलेले वीज खांब बदलले, नागरिकांनी घेतली खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: कुडतरी भागात गेल्या काही दिवसांपासून वीज प्रवाह खंडित होत आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे फोंडा ते रायपर्यंतची ३३ केव्ही लाईनवरील आठ वीज खांब मोडल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथील शेतातही कमरभर पाणी भरल्याने देखील तिथे जाऊन काम करता येत नव्हते. परंतु आता मोडलेले वीज खांब बाहेर काढले असून ते परत उभे केले आहेत. त्यामुळे वीज प्रवाह सुरळीत होईल, असे आश्र्वासन वीज खात्याचे अधिक्षक अभियंता राजीव सामंत यांनी कुडतरी येथील शिष्टमंडळाला दिले.

बुधवारी सकाळी कॉंग्रेसचे नेते मोरेनो रेबेलो तसेच जिल्हा पंचायत सदस्या मिशेल रेबेलो यांच्या नेतृत्वाखालील कुडतरी येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आके पावर हाऊस येथे जाऊन अधिक्षक अभियंता राजीव सामंत यांची भेट घेतली.

यावेळी सामंत यांनी सांगितले की, सात कोटी रुपये खर्चून कुडतरीत भूमीगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण केले असून एक दोन दिवसांत ही वाहिनी कार्यान्वित केली जाईल. त्यानंतर थेट ११ केव्ही फिडरवरून कुडतरीत वीज प्रवाह सुरु होईल. तसेच कुडतरीसाठी आणखी दोन योजना लागू करण्यात येणार आहेत.

यात ५१ कोर्स ११ केव्ही वीज प्रवाह सर्वत्र जोडणी दिली जाईल व ११ कोटी रुपये खर्चून ॲण्टी लाइनचे नूतनीकरण केले जाईल. ही कामे पुढील पावसापूर्वी पूर्ण केली जाईल.

नागरिकांच्या तक्रारी

शिष्टमंडळातील एका महिलेने सांगितले की, वीज खात्याला फोन केले तर कुणीही फोन उचलीत नाहीत. दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की, पथदीप गेले एक महिना बंद आहेत. तिसऱ्या व्यक्तीने सांगितले की रामनगरीत गेले महिनाभर पथदीप पेटत नाहीत. तसेच या परिसरात एकदा वीज प्रवाह बंद झाला तर सहा-सात तास तो सुरु केला जात नाही.

बैठक सकारात्मक : रेबेलो

या भेटीबाबत मोरेनो रेबेलो यांनी सांगितले की, अधिक्षक अभियंता राजीव सामंत यांच्याकडील बैठक एकदम सकारात्मक पद्धतीने झाली. त्यांनी आमचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्र्वासन दिले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून वीज प्रवाह सुरळीत नसल्याने आम्ही अभियंत्याची भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT