Electricity Problem Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Issue: सासष्टीत अनेकांना वीज तोडण्याच्या नोटिसा

Goa Electricity Issue: गोम्स: तोडग्यासाठी पैशांची मागणी; तक्रारी

दैनिक गोमन्तक

Goa Electricity Issue: सासष्टी तालुक्यात अनेकांना वीज जोडणी तोडण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत.

त्यात अशा नोटिसा गेलेल्या लोकांची प्रकरणे परस्पर मिटवण्याचे आश्‍वासन देऊन दोन हजार रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा वीज अधीक्षकांनी अशा प्रकरणात आम्ही लक्ष घालून बाहेर कोणी पैसे घेणार नाही याकडे लक्ष देऊ, असे आश्‍वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी दिली.

विद्युत भवनात काँग्रेसचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी मुख्य वीज अभियंत्यांची भेट घेऊन वरील वीज जोडणी तोडण्याबाबत आलेल्या नोटिसांचा विषय मांडण्यास आले होते.

परंतु मुख्य अभियंते नसल्याने त्यांच्या विशेष कर्तव्य अधिकाऱ्याकडे या शिष्टमंडळाने विषय मांडला. याप्रसंगी मेल्विन फर्नांडिस, योगेश नार्वेकर यांची उपस्थिती होती.

विशेष कर्तव्य अधिकाऱ्याने दक्षिण गोवा वीज पुरवठा खात्याचे अधीक्षकांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी कोणालाही दोन हजार रुपये देण्याची गरज नाही, असे सांगितले.

ज्यांना वीज तोडणीच्या नोटिसा आल्या आहेत, ते लोक आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत. परंतु आम्हाला मार्गदर्शन करण्यास कोण नाहीत. मोठ्या प्रमाणात वीज जोडण्या तोडण्याच्या नोटिसा आल्या आहेत, याचा सरकारने विचार करायला हवा.

ज्यांना नोटिसा आल्या आहेत, ते गरीब लोक आहेत. नोटिसांची प्रकरणे मिटवण्यासाठी काही लोक दोन हजार रुपये घेत आहेत, वाहतूक खाते व इतर खात्यांबाहेर एजंट म्हणून काम करणारे लोक जसे दिसतात, तसाच हा प्रकार असल्याचे गोम्स म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT