Nilesh Cabral, Curchorem Sanguem Electricity department Employees  Dainik Gomantak
गोवा

Goa Line Helper: लाईन हेल्परना पगार वेळेवर मिळेना, आमदार काब्राल यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन, दोन दिवसांत तोडगा काढणार

Curchorem Sanguem Electricity Department Salary Issue: कुडचडे वीज खात्याच्या लाईन हेल्परना वेळेवर पगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ त्‍यांनी तसेच सांगे कार्यालयातील वीज कर्मचाऱ्यांनी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Curchorem Sanguem Electricity Department Salary Issue

कुडचडे: कुडचडे वीज खात्याच्या लाईन हेल्परना वेळेवर पगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ त्‍यांनी तसेच सांगे कार्यालयातील वीज कर्मचाऱ्यांनी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्‍याची दखल घेत काब्राल यांनी तात्काळ वीज खात्‍याच्‍या मुख्य अभियंत्याशी संपर्क साधून हा प्रश्‍‍न सोडविण्‍याची सूचना केली. त्‍यानंतर त्‍यांनी दोन दिवसांत पगार देण्याचे मान्य केले.

सविस्तर माहितीनुसार, कुडचडे वीज डिव्हिजनमधील सुमारे पन्नास-साठ कर्मचारी गेल्या फेब्रुवारी महिन्यात कामावर रुजू झाले होते. तीन-चार महिन्यांचा पगार दिल्यानंतर त्यांना मुख्य अभियांत्यांनी अपुऱ्या निधीचे कारण पुढे करून थकीत पगार फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरळीतपणे देण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिले होते.

मात्र राज्यातील अन्य डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांना विशेषत: लाईन हेल्परना वेळेवर पगार दिला जात असताना केवळ कुडचडे डिव्हिजनमधील लाईन हेल्परनाच वेळेवर पगार दिला जात नसल्याचे त्‍यांच्‍यात असंतोष निर्माण झाला होता.

या कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांना विनंती केली. संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा कल्‍पना दिली. पण उपयोग झाला नाही. काल हे कर्मचारी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कुडचडे कार्यालयात गेले असता ते रजेवर असल्याचे समजले. त्‍यानंतर त्‍यांनी आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेतली. त्‍यांनी तातडीने सूत्रे हलविली. तसेच दोन दिवसांत पगार न मिळाल्‍यास पुन्‍हा आपल्याला भेटण्‍यास सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT