electricity Dainik Gomantak
गोवा

Pernem Electricity Issue: पेडणे तालुक्यात दरदिवशी विजेचा लपंडाव

वीजवाहिनीवर भार वाढला : मोठ्या प्रकल्पांचा परिणाम; दोन वीज उपकेंद्रांची आवश्‍यकता

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Electricity Issue : पेडणे तालुक्यातील एकूण २० ग्रामपंचायती आणि एक नगरपालिका क्षेत्रामध्ये असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी विजेचा लपंडाव झाला नाही. प्रत्येक पंचायत क्षेत्रात दिवसाला दहा ते बारा वेळा वीज येते परत जाते, येते परत जाते, अशी स्थिती आहे.

थिवी सबस्टेशनपासून पेडणे तालुक्याला जाणारी ३३ केव्ही मुख्य वाहिनीवर पूर्णपणे भार वाढला आहे. मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल, चांदेल जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्तावित विस्तार, डब्ल्यूआरडीद्वारे प्रस्तावित बैलपार वॉटर प्लांट या मोठ्या प्रकल्पांमुळे येथे वीज समस्या निर्माण होत आहे.

पेडणे आणि तुये या वीज उपकेंद्रावरील भार कमी करण्यासाठी मांद्रे आणि मोपा विमानतळ परिसरासाठी आणखी दोन वीज उपकेंद्र उभारा.

ही काळाची गरज आहे, अशी मागणी पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी केली.

‘मांद्रे’त समस्या सुटणार!

मांद्रे मतदारसंघात भूमिगत वीज केबल घालण्याची प्रक्रिया सुरू झाली. या भागात केबल घालताना अनेक नागरिकांना त्रास झाला. मात्र, कोणीही खोदकाम अडविले नाही.

भूमिगत वीज केबल आणि नवीन स्वतंत्र वीज विभागीय केंद्र मांद्रे या ठिकाणी सुरू होत असल्याने ही समस्या सुटणार, असा विश्वास आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

पेडणे पालिकेची आडकाठी

लोडची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विभागाने थिवी सबस्टेशन ते तुये सबस्टेशन ते पेडणे सबस्टेशनपर्यंत नवीन २ क्रमांकाच्या ३३ केव्ही भूमिगत केबल्स प्रस्तावित केल्या होत्या.

ही भूमिगत वीज केबल टाकण्यासाठी पेडणे नगरपालिकेने परवानगी न दिल्याने पेडणे न्यायालय ते मालपेपर्यंत गेल्या ३ महिन्यांपासून काम प्रलंबित आहे.

नवीन प्रकल्पासाठी आवश्‍यक वीजपुरवठा हा प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीनेच करावा, अशी अट घालणे गरजेचे आहे. सरकार तसे न करता सर्वसामान्यांच्या वाट्याची वीज मोठ्या प्रकल्पांना देते. हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. वीज तुटवड्याच्या नावाखाली नवीन प्रकल्प गोव्यात राबवून जमिनीचा सौदा करण्याचा मार्ग मात्र सरकारने यापुढे निवडू नये.

- उदय महाले, सामाजिक कार्यकर्ते, उगवे .

पर्यटन हंगामात किनारी भागात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असल्यामुळे गावात कमी दाबाचा वीजप्रवाह येतो, अशा तक्रारी वाढत आहेत. अनेक भागात आजही काही वीजखांब धोकादायक स्थितीत आहेत. शिवाय जीर्ण वीजवाहिन्या लोंबकळत असल्याने वीजप्रवाह खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ होते.

- व्यंकटेश नाईक, पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT