Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांनो सज्ज व्हा; आयोगा कडुन 8% दरवाढ मंजूर केल्यामुळे वीज बिल महागणार

संयुक्त वीज नियामक आयोगाने (JERC) घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात सरासरी 8% वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: संयुक्त वीज नियामक आयोगाने (JERC) घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात सरासरी 8% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. तसेच गोवा आणि केंद्रशासित प्रदेशातील ऊर्जा क्षेत्राचे नियमन करणाऱ्या आयोगाने अन्य श्रेणींसाठी - व्यावसायिक, लष्करी, अभियांत्रिकी सेवा आणि तात्पुरती जोडण्यांसाठी दर कमी करण्यास मान्यता दिली आहे.

औद्योगिक, होर्डिंग्ज/साइनबोर्ड आणि सिंगल पॉइंट सप्लाय श्रेण्यांसाठी दर समान राहतील. अशा प्रकारे, सर्व श्रेणींमध्ये, आयोगाने मंजूर केलेल्या दरांमध्ये सरासरी वाढ 1.6% आहे. सार्वजनिक प्रकाशासाठी, JERC ने टॅरिफमध्ये 33% वाढ मंजूर केली आहे. घरगुती ग्राहकांसाठी ऊर्जा शुल्कातील वाढ 10 पैसे ते 95 पैसे प्रति किलोवॅट प्रति तास आहे. व्यावसायिक ग्राहकांच्या बाबतीत, निश्चित मासिक शुल्क समान राहिले असुन ऊर्जा शुल्क कमी झाले. सरकारने अधिसूचित केल्यानंतर नवीन दर लागू होतील.

या निवडणूक वर्षासाठी, गोवा (Goa Electricity Department) वीज विभागाने, आयोगाकडे पाठवलेल्या त्यांच्या दर प्रस्तावात, वीज दरवाढीची शिफारस केलेली नाही. आयोगाने दरवाढीची शिफारस करूनही ग्राहक 2019 पासून समान दर भरत आहेत. मंजूर 2019-2020 दर अद्याप लागू आहेत. मंत्रिमंडळाने, महामारीच्या (Covid Pandemic) काळात राज्यातील आर्थिक क्रियाकलापांना चालना देण्यासाठी, तत्कालीन टॅरिफ ऑर्डर 2020-21 स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT