गुढी पाडव्यानिमित्त केप्यात भव्य फेरी

गुढी पाडवा म्हणजे हिंदूंचे नवीन वर्ष
Gudi Padwa
Gudi PadwaDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: गुढी पाडव्यानिमित्त हिंदू रक्षा महाआघाडी संस्थेतर्फे काल केपे तालुक्यातील विविध हिंदू संस्थांच्या सहकार्याने कुडचडेत भव्य फेरी काढण्यात आली. गुढी पाडवा म्हणजे हिंदूंचे नवीन वर्ष असून आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून काल या फेरीचे आयोजन केल्याचे डॉ. गुरुदास नाईक यांनी सांगितले. हिंदू समाज विखुरला असून सर्वांनी एकत्र येऊन देशात सुख समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Gudi Padwa
घोगळ येथे चोरांनी मंगळसूत्र पळविले

31 डिसेंबर हे आमचे नवीन वर्ष नसून ज्याप्रमाणे त्यादिवशी नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्यात येते ती आमची संस्कृती नसून ते पूर्णपणे चुकीचे आहे. काल जी फेरी काढण्यात आली आहे त्यातून आमच्या युवा युवतींनी प्रेरणा घेऊन आमची सनातन संस्कृती राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कुडचडे बाजारातून काढलेल्या या भव्य फेरीत मोठ्या संख्येने केपे तालुक्यातील देवस्थानच्या सदस्यांनी व हिंदू संस्थांनी भाग घेतला होता. दिंडी पथकाच्या टाळ - मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या या फेरीत महिला व युवक उत्साहाने सहभागीझाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com