Electricity Bill Dainik Gomantak
गोवा

Electricity Bill: वीज बिल घाेटाळा प्रकरण रखडले

Electricity Bill: 25 वर्षांपूर्वी घडलेले आणि त्‍यामुळे साक्षीदारांच्‍याही विस्‍मृतीत गेलेले 4.54 कोटींचा वीज बिल सवलत घोटाळा प्रकरण सध्‍या साक्षीदार सापडत नसल्‍याने रखडले आहे.

दैनिक गोमन्तक

Electricity Bill: 25 वर्षांपूर्वी घडलेले आणि त्‍यामुळे साक्षीदारांच्‍याही विस्‍मृतीत गेलेले 4.54 कोटींचा वीज बिल सवलत घोटाळा प्रकरण सध्‍या साक्षीदार सापडत नसल्‍याने रखडले आहे. या प्रकरणातील कित्‍येक साक्षीदार गोव्‍याबाहेरचे असल्‍याने आणि काही निवृत्त सरकारी साक्षीदारांचे वास्तव्य पत्ते बदलल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात जारी केलेले समन्‍स परत येऊ लागले आहेत.

परिणामी गेल्या चार सुनावण्‍यांत न्‍यायालयाने साक्षीदारांना समन्‍स जारी करण्‍याव्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणतेही काम केलेले नाही.

सध्‍याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्‍हो हे मुख्‍य संशयित असल्‍याने या प्रकरणाच्‍या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र, आजही या प्रकरणात कुणाचीही साक्ष नोंदविली गेलेली नाही. खास न्‍यायाधिश इर्शाद आगा यांनी आज चार साक्षीदारांना समन्‍स जारी केले, तर यापूर्वी ज्‍यांचे समन्‍स पत्ता न सापडल्‍याने परत आले होते, अशा तीन साक्षीदारांना फेर समन्‍स बजावले.

या प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी की, १९९८ साली माविन गुदिन्‍हो हे काँग्रेस सरकारात वीज मंत्री असताना मर्जीतील कारखानदारांना त्‍यांनी अवैधरित्‍या वीज बिल सवलतीचा लाभ दिला.

त्‍यामुळे सरकारचे ४.५२ कोटींचे नुकसान झाल्‍याचा दावा करून क्राईम ब्रँचने गुदिन्‍होंविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

टी.नागराजनही सुनावणीस गैरहजर

ज्‍या कारखान्‍यांना वीज बिलात सवलत मिळाली त्‍यांच्‍या प्रतिनिधींनाही या प्रकरणात आराेपी करण्‍यात आले आहे. आज या प्रकरणाची सुनावणी होती. मंत्री गुदिन्‍हो यांना यापूर्वीच या प्रकरणात कायमस्‍वरूपी गैरहजर रहाण्‍याची मुभा न्‍यायालयाने दिली आहे. दुसरे संशयित टी. नागराजन हेही आज सुनावणीस गैरहजर होते. त्‍यांच्‍यातर्फे त्‍यांच्‍या वकिलांनी गैरहजेरीसाठी अर्ज केला, तो न्‍यायालयाने मान्‍य केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT