Goa Shack: शॅक व्‍यवसायासाठी वयोमर्यादेची अट जाचक

Goa Shack: गोवा सरकारने जे नवीन शॅक धोरण जाहीर केले आहे त्‍यात हा व्‍यवसाय करण्‍यासाठी व्‍यावसायिकाची कमाल वयोमर्यादा 60 वर्षे ठेवल्‍याने संपूर्ण गोव्‍यातील शॅक व्‍यावसायिक नाराज आहेत
Goa Shack Policy
Goa Shack PolicyDainik Gomantak

Goa Shack: गोवा सरकारने जे नवीन शॅक धोरण जाहीर केले आहे त्‍यात हा व्‍यवसाय करण्‍यासाठी व्‍यावसायिकाची कमाल वयोमर्यादा 60 वर्षे ठेवल्‍याने संपूर्ण गोव्‍यातील शॅक व्‍यावसायिक नाराज असून पारंपरिक शॅक व्‍यावसायिकांना या व्‍यवसायातून बाहेर फेकायचे, हे या सरकारचे कारस्‍थान, अशा शद्बांत त्‍यांनी आपली नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

Goa Shack Policy
Illegal Hoarding: म्हापसा पालिका क्षेत्रात आहेत 65 बेकायदा होर्डिंग्स

याचा जाब विचारण्‍यासाठी सोमवारी (ता.११) आम्‍ही पर्यटन संचालकांची भेट घेऊ, अशी माहिती गोवा शॅकमालक कल्‍याण संघटनेचे अध्‍यक्ष क्रुझ कार्दोज यांनी दिली.

क्रुझ कार्दोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शनिवारी (ता.9) दक्षिण गोव्‍यातील काही शॅक व्‍यावसायिकांनी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांची भेट घेतली. यावेळी व्‍हिएगस यांनीही या धोरणावर आपला विरोध व्‍यक्‍त करताना, सरकारने हे धोरण ठरविण्‍यापूर्वी किनारपट्टी भागातील आमदारांना विश्र्वासात घेण्‍याची गरज होती,

असे मत व्‍यक्‍त केले. स्‍थानिक व्‍यावसायिकांसाठी ज्‍या अटी जाचक आहेत त्‍या बदलण्‍यात याव्‍यात यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन आपण चर्चा करू, असे यावेळी व्‍हिएगस यांनी सांगितले.

गोव्याची नवी शॅक पॉलिसी

गोवा म्हटले की बीच आणि बीच म्हटले की शॅक्स... असं हे समीकरण राज्यातील स्थानिकांच्या अर्थकारणातील महत्वाचे अंग आहे. राज्य सरकारचे बीच शॅक्स उभारण्याबाबत एक धोरण आहे, त्याचे काही नियम आहेत.

नुकतेच गोवा स्टेट शॅक पॉलिसी (Goa State Shack Policy 2023-2026) पुढील तीन वर्षांसाठी मंजूर करण्यात आली आहे. सरकारने शॅकच्या नियमांमध्ये काही महत्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. काळानुसार हे बदल गरजेचे असल्याचे म्हणत सरकारने त्याचे समर्थन केले असून, शॅक व्यवसायिक नव्या पॉलिसीचा विरोध करत आहेत. नवी शॅक पॉलिसी नेमकी काय आहे आणि त्यावरुन वाद का होतोय? जाणून घेऊया सविस्तर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com