Electricity and water issue in Chorao island
Electricity and water issue in Chorao island 
गोवा

चोडण बेटावरील वीज दिवसभर गुल!

दैनिक गोमन्तक

पणजी : गेल्‍या तीन दिवसांपासून चोडण बेटावर विजेचा लपंडाव सुरू आहे. काल बुधवारी तर दिवसभर वीज गायब होती. त्‍यामुळे लोकांना मनस्‍ताप सहन करावा लागला. मान्‍सूनपूर्व कामांचा एक भाग म्‍हणून वीज खात्याने चोडण बेटावर वीज दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वीज बंद असेल अशी पूर्वकल्पना दिली असली तरी देलेल्या वेळेत हे काम पूर्ण होऊनही लोयला भागात वीज बिघाड झाल्याने चार तास आणखी बत्ती गुल होती. परिणामी काल तब्‍बल नऊ तास चोडणवासीयांना विजेविना राहावे लागले. संध्याकाळी 6 वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला, पण दिवसभर लोक घामाघूम झाले.

चोडण येथे काल दोन कुंटुंबांमध्‍ये लग्नकार्य होते. पण वीज नसल्‍याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. लोकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. चोडण वीज खात्यातील कनिष्ठ अभियंत्‍यांनी तर आपला मोबाईल बंदच करून ठेवण्यात धन्यता मानली. कचेरीतील फोनही बंद असल्याने झाले तरी काय? वीज येणार तरी कधी? याची कल्पना कुणालाच मिळत नव्‍हती. त्‍यामुळे लोकांचा मनस्ताप आणखी वाढला.

याबाबत बोलताना परिसरात देखरेख करणारे वीज खात्याचे सहाय्यक अभियंते कुट्टीकर यांनी सागितले की, गेले तीन दिवस गडगडाटासह पडलेला पाऊस आणि झाडांची झालेली पडझड याचा परिणाम वीजपुरवठ्यावर झाला. साहजिकच पाणीपुरवठाही विस्‍कळीत झाला. नळाला पाणी न आल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

चोडणमध्ये काल बुधवारी दोन लग्नकार्ये होती. मात्र वीज नसल्‍याने त्‍या कुटुंबांची तारांबळ उडाली. तसेच दोन दिवसांपूर्वी श्री देवकीकृष्ण देवस्‍थानच्‍या वर्धापनदिन सोहळ्‍यात आणि देवगी येथील श्री गवळेश्‍‍वर देवस्थानाच्‍या उत्‍सवातही वीज नसल्‍याने व्‍यत्‍यय आला होता. मंगळवारी चोडण सम्राट क्लबतर्फे आयोजित नाटकावेळीही वीज गायब झाल्याने आयोजकांना मोठा फटका बसला. दुसरीकडे उकाडा एवढा वाढला आहे की रात्रीच्‍या वेळी झोपणे मुश्‍कील होते. अनेक लघुउद्योग, व्यापाऱ्यांनाही वीज नसल्‍याने फटका बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

SCROLL FOR NEXT