Konkan Railway  Dainik Gomantak
गोवा

कोकण रेल्वे मार्गावरून टप्प्याटप्प्यात धावणार विजेच्या गाड्या

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण : मुंबई-रत्नागिरी, कारवार-बंगळुरु मार्गावर विजेच्या गाड्या सुरु

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर टप्प्याटप्प्यात विजेवर चालणाऱ्या गाड्या धावू लागणार आहेत. सध्या मुंबई ते रत्नागिरी आणि कारवार ते बंगळुरु या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या गाड्या सुरू झाल्या आहेत.

कोकण रेल्वे (Konkan Railways) मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती. एकूण 6 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात आले. रत्नागिरी ते थिवी या शेवटच्या टप्प्याचे काम या मार्च महिन्यात पूर्ण होऊन 28 मार्च रोजी रेल्वे सुरक्षा मंडळाने त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही कोकण रेल्वेचे अभिनंदन केले.

कोकण रेल्वेचा हा संपूर्ण मार्ग जरी आता विद्युतीकरणाने सज्ज झाला असला तरी विजेवर चालणारी इंजिने त्याप्रमाणात आणावी लागणार आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने या मार्गावर विजेवर चालणाऱ्या गाड्या धावण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

एकूण 1285 कोटी रुपये या कामासाठी खर्च करण्यात आले असले तरी या मार्गावर रेल्वे (Railways) विजेवर धावल्या तर कोंकण रेल्वेचा जो इंधनावरील खर्च आहे तो 150 कोटींनी कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषणही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कमी होणार, अशी अपेक्षा घाटगे यांनी व्यक्त केली. सध्या कोकण रेल्वेला इंधनावर सरासरी 310 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT