Court Dainik Gomantak
गोवा

Illegal Cables: इंटरनेट सेवा पुरवठादारांना दिलासा! वीजखांब गैरवापर प्रकरणी याचिका मागे; शुल्‍काबाबतचा प्रश्‍‍न प्रलंबित

Electric poles misuse in Goa: वीजखांबांचा गैरवापर केल्याप्रकरणी वीज खात्याकडून केबल कापण्याची कारवाई तूर्त बंद करण्‍यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: वीजखांबांचा गैरवापर केल्याप्रकरणी वीज खात्याकडून केबल कापण्याची कारवाई तूर्त बंद करण्‍यात आली आहे. तसेच जमा करावयाच्‍या शुल्कासंदर्भात प्रत्येक इंटरनेट सेवा पुरवठादाराने वेगळ्या याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे ही याचिका मागे घेण्यात येत असल्याची माहिती याचिकादार अखिल गोवा इंटरनेट सेवापुरवठा संघटनेने दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही याचिका निकालात काढली.

राज्यातील ग्राहकांना इंटरनेट सेवेचा पुरवठा करण्यासाठी वीजखांबांचा गैरवापर केल्याप्रकरणी वीज खात्याकडून सुरू असलेल्या कारवाईविरोधात अखिल गोवा इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेने याचिका दाखल केली होती.

वीज खात्याने सुरू केलेली ही कारवाई बेकायदेशीर आहे. कारवाई करण्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली नाही. सरकारनेही या कारवाईला स्थगिती देऊन आवश्‍यक ती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

वीजखांबांचा वापर केल्याप्रकरणीचे सर्व शुल्क संघटनेच्या सदस्यांनी जमा केलेले असून कोणतीही थकबाकी नाही. यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी बाजू याचिकादारातर्फे ॲड. अभिजीत गोसावी यांनी मांडली. याचिकेद्वारा केलेली केबल न कापण्याची विनंती तूर्त पूर्ण झाली आहे व उर्वरित शुल्कासंदर्भातचा प्रश्‍न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT