Illegal Cables Panaji: राजधानी पणजीत पुन्हा इंटरनेट सेवा विस्‍कळीत! वीज खात्‍याची धडक कारवाई; 43 वीजखांबांवरील बेकायदा केबल्स कापल्‍या

Goa Power Department Crackdown: वीज विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्‍यात आली. परवानगीशिवाय कोणीही वीजखांबांचा वापर करू नये, असे त्‍यांनी बजावले.
Goa Power Department Crackdown
Illegal Cables PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Electricity Department Cuts Illegal Cables in Panaji Internet Services Disrupted

पणजी: कारवाईला स्‍थगिती देण्‍याची इंटरनेट सेवादारांची मागणी उच्‍च न्‍यायालयाने फेटाळल्‍यानंतर मंगळवारी (25 फेब्रुवारी) वीज खात्‍याने राजधानी पणजीत धडक मोहीम हाती घेताना 43 वीजखांबांवरील केबल्स कापल्‍या. मात्र या कारवाईनंतर पणजीत इंटरनेट सेवा विस्‍कळीत झाली. त्‍याचा फटका अनेकांना बसला. वीज विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्‍यात आली. परवानगीशिवाय कोणीही वीजखांबांचा वापर करू नये, असे त्‍यांनी बजावले.

वीज विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्‍यात आली. परवानगीशिवाय कोणीही वीजखांबांचा वापर करू नये, असे त्‍यांनी बजावले.

Goa Power Department Crackdown
Illegal Cables: वीज खांबांवरच्या केबल्स रस्त्यांवर! कारवाईनंतर वेगळीच समस्या; वाहनचालक, पादचाऱ्यांसाठी अडचण

वीज विभागाने यापूर्वीच केबल आणि इंटरनेट (Internet) सेवा पुरवठादारांना वीजखांबांचा वापर करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेण्यास सांगितले होते. त्यासाठी मुदतही दिली होती. मात्र, परवानगी न घेता केबल टाकणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. केबल सेवा पुरवठादारांनी या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने वीज विभागाच्या भूमिकेचे समर्थन करत ही कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले.

दरम्‍यान, वीज खात्याच्या या कारवाईमुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. याचा फटका व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्र तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या लोकांना बसला. तसेच बँकिंग सेवा, ऑनलाईन व्यवहार व इतर महत्त्वाची कामे खोळंबली. व्यावसायिक, दुकानदार आणि कंपन्यांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले. त्‍यामुळे त्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.

Goa Power Department Crackdown
Illegal Cables: ‘आयटी’-वीज खात्यातील विसंवादामुळे इंटरनेट सेवा ठप्प! केबल्स कापल्याने संघटनांनी व्यक्त केली नाराजी

कार्निव्हलच्‍या तारासुद्धा केल्‍या ‘कट’

जुना पाटो पूल ते डॉन बॉस्को हायस्‍कूलपर्यंतच्या केबल्स आज कापण्यात आल्या आहेत. तसेच, परवानगीशिवाय कार्निव्हलसाठी टाकलेल्या सीरियल लाईट्सच्या ताराही कापण्यात आल्या. कार्निव्हलसाठी तारा टाकायच्या असल्यास कंत्राटदाराने रीतसर परवानगी घेऊन त्या टाकाव्यात, असे काशिनाथ शेट्ये यांनी स्पष्ट केले. दरम्‍यान, पुढील टप्प्यात मडगाव आणि वास्को (Vasco) येथेही ही मोहीम राबविली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com