Election Officer Live Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सरासरी 80% मतदान; मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची माहिती

गोव्यात 78.94% मतदान झाले आहे. यापैकी सर्वाधिक मतदान हे साखळी मतदारसंघात 89.64% तर असून सर्वात कमी मतदान बाणावली मतदारसंघात 70.02% मतदान झाले.

दैनिक गोमन्तक

Election Office Live: आज गोव्यात आठव्या विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. निवडणुकीआधी आयोगातर्फे सर्वतोपरी तयारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकरचा गुन्हा घडू नये यासाठी गोवा पोलिस प्रशासन सज्ज होते. 2022चे गोवा विधानसभा निवडणुकीचे एकूण मतदान इतके 78.94% % झाले आहे.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी (Election Incharge) कुणाल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करत जनतेशी संवाद साधला.

कुणाल यांनी आज झालेल्या मतदानाचा आढावा सांगितला. या निवडणुकीसाठी एकूण 301 उमेदवार उभे होते; त्यापैकी 275 पुरुष आणि 26 महिला उमेदवारांचा समावेश होता. राज्यात एकूण 1722 मतदान केंद्रे होती. यावर्षी माहितीप्रमाणे 78.94% मतदान झाले. यापैकी सर्वाधिक मतदान हे साखळी मतदारसंघात (Sanquelim) झाले असून सर्वात कमी मतदान बाणावली मतदारसंघात (Benaulim) झाले आहे. त्याचबरोबर उत्तर गोव्यात एकूण 79.84% तर दक्षिण गोव्यात 78.15% मतदान पार पडले.

आयोगाच्या आदेशानुसार, मतदानापूर्वीच्या 48 तासांमध्ये शांतता काळात प्रचारबंदी असूनसुद्धा ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून निवडणुकीसंदर्भात पोस्ट करण्यात आल्या, त्यापैकी 30 पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

कुणाल पुढे म्हणाले, या निवडणुकीमध्ये अजून एक प्रकार राबवला, तो म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करत आयआयटी गोवाच्या मदतीने वेबकास्टिंग करण्यात आले. यामध्ये कम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करत मतदानाला येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व मतदारांवर आम्हाला नजर ठेवता आली; जेणेकरून प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवणे आम्हाला या तंत्रज्ञानाद्वारे शक्य झाले.

आज दिवसभरात झालेला मतदानाबद्दल पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार म्हणाले की, आजचे मतदान शांततेत पार पडले असले तरी मतदानादरम्यान तक्रार नोंद झालेल्या 5 तक्रारींचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शांततेत ही निवडणूक पार पडली आहे; कारण संपूर्ण टीम राज्यभरात तैनात असून कोणताही गुन्हा घडू नये यासाठी सतर्क होती. गंभीर गुन्हे असलेल्यांवर लक्ष ठेवून होतो.

उत्तर गोवा मतदान टक्केवारी (सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)

  • मांद्रे - 84.00

  • पेडणे - 83.00

  • डिचोली - 87.84

  • थिवी - 80.25

  • म्हापसा - 77.43

  • शिवोली - 79.00

  • साळगांव - 77.00

  • कळंगुट - 77.00

  • पर्वरी - 75.00

  • हळदोणा - 75.51

  • पणजी - 73.75

  • ताळगाव - 75.38

  • सांताक्रुज - 73.97

  • सांतआंद्रे - 72.85

  • कुंभारजुवे - 77.65

  • मये - 84.33

  • साखळी - 89.64

  • पर्ये - 86.04

  • वाळपई - 82.00

दक्षिण गोवा मतदान टक्केवारी (सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)

  • प्रियोळ - 87.73

  • फोंडा - 77.89

  • शिरोडा - 82.66

  • मडकई - 81.27

  • मुरगाव - 81.28

  • वास्को दि गामा - 70.52

  • दाबोळी - 74.89

  • कुठ्ठाळी - 76.13

  • नुवे - 76.80

  • कुडतरी - 72.41

  • फार्तोर्डा - 76.69

  • मडगाव - 74.84

  • बाणावली - 70.20

  • नावेली - 72.80

  • कुंकळ्ळी - 76.15

  • वेळ्ळी - 72.41

  • केपे - 83.45

  • कुडचडे - 80.29

  • सावर्डे - 86.42

  • सांगे - 85.69

  • काणकोण - 82.11

निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या सजावटीचे आणि एकंदरीत तयारीचे जनतेने भरघोस कौतुक केले. दरम्यान, जनतेने केलेल्या या मतदानाचा कौल कुणाच्या बाजूने असणार? कोण बाजी मारणार आणि कुणाचे सरकार स्थापन होणार याची आता सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. 10 मार्च नंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे त्याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT