गोवा

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sanquelim Robbery: सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास केरी सत्तरी येथील आनंदी गावस ही वृद्ध महिला बाजारात विक्रीसाठी भाजी घेऊन बसली होती.

Manish Jadhav

साखळी: साखळी बाजारातील एका वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील सोन्याची पाटली तिला संमोहित करुन लंपास करण्याचा प्रकार शुक्रवारी (26 सप्टेंबर) सकाळी घडला. या घटनेमुळे बाजारात एकच खळबळ उडाली असून भाजी विक्री करणाऱ्या महिलाही सुरक्षित नसल्याची चर्चा बाजारात सुरु झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास केरी सत्तरी येथील आनंदी गावस ही वृद्ध महिला बाजारात विक्रीसाठी भाजी घेऊन बसली होती. त्याचवेळी, एक पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला तरुण तोंडावर मास्क घालून तिच्याकडे आला. त्याने त्यांच्याकडून 50 रुपयांची तांबडी भाजी घेतली. ही भाजी घेतानाच तिच्याशी गोड बोलून आपण नवीन धंदा सुरु करत असून त्यासाठी शेजारीच असलेल्या सप्तशती मंडपात देवीला फुले वाहून धंदा करत आहे. त्यासाठी आपणास मदत करण्याची विनंती केली. या विनंतीवरुन आनंदी गावस या त्या तरुणाच्या मदतीस गेल्या.

मंडपात देवासमोर पुष्पहार ठेवून तरुणाने आनंदी गावस यांना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व हातातील पाटली त्या पुष्पहारसह ठेवण्यास सांगितले. सोन्याचे दागिने देवासमोर ठेवून काहीतरी मागितल्यास चांगले फळ मिळते, असे त्याने आनंदी गावस यांना सांगताच त्यांनी त्याच्या अंगावरील काहीतरी ठेव असेही त्याला प्रत्युत्तर दिले. परंतु सदर तरुणाने आपण याच गावचा असल्याने गावातीलच कोणीतरी आपल्या अंगावरील दागिने ठेवून सांगणे केल्यास त्याचे फळ बरे मिळते, असे तिला उलट उत्तर देत अंगावरील दागिने ठेवण्यास सांगितले.

त्याबरोबर आनंदी गावस यांनी आपल्या गळ्यातील सोनसाखळी व आतील एक पाटली त्या पुष्पहारसह ठेवले व देवाकडे पाहून हात जोडून पूजा केला. ते दोघेही मंडपातून बाहेर यायला निघाले असता आनंदी गावस यांनी सदर तरुणास आपले सोन्याचे दागिने कुठे असल्याचे विचारले. त्यावर त्याने दागिने पुष्पहारासह तुमच्याच पिशवीत घातल्याचे संगितले. त्यांनी पिशवीत आपली सोनसाखळी व पाटली शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ते सापडले नाही. पिशवीत आपले दागिने नसल्याचे समजताच त्यांनी मागे वळून पाहिले असता सदर तरुणही गायब झाला होता. त्यांना त्याला परिसरात शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला व सगळा प्रकार बाजारातील लोकांना व इतर भाजीविक्रेत्यांनाही सांगितला.

त्यानंतर लागलीच या प्रकाराची माहिती त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला दिल्यावर ते तात्काळ बाजारात पोहोचले व त्यांनी साखळी पोलिस (Police) ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रश्मीर परब मातोंडकर, हेड कॉन्स्टेबल निलेश फोगेरी व इतर पोलीस कर्मचारी साखळी बाजारात दाखल होऊन चौकशीला सुरुवात केली. विविध ठिकाणीचे सीसीटीव्ही कॅमेरे यावेळी पोलिसांनी तपासले.

केळबाईवाडा मयेतील प्रकारशी साम्य प्रकार

केळबाईवाडा मये येथे देवी केळवळीच्या मंदिराबाहेर बसणाऱ्या एका फुल विक्रेत्या वृद्ध महिलेलाही अशाच प्रकारे एका भामट्याने गंडा घातला होता. मंदिरात नारळ ठेवून देवीला मागणे मागायचे असल्याचे सांगून तिला संमोहित केले. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास केली होती. आता साखळीत घडलेली घटना मयेतील घटनेशी साम्य असून सदर भामटा वृद्ध महिलांनाच एकाच प्रकारे लक्ष बनवीत असून त्यांना संमोहित करुन त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिचोली (Bicholim) पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT