Car Accident  Dainik Gomantak
गोवा

Margao Bus Accident: रस्ता ओलांडताना खासगी बसची धडक, ज्येष्ठ नागरिक ठार; मडगावातील दुर्दैवी घटना

Goa Bus Accident Death: सकाळी साडेसातच्या दरम्यान येथील ओल्ड मार्केट सर्कलजवळ अपघाताची घटना घडली. जोसेफ बाप्तिस्ता (६७) असे मृताचे नाव आहे. तो मूळ मालभाट येथील आहे.

Sameer Panditrao

मडगाव: रस्ता ओलांडताना बसची धडक बसून एक ज्येष्ठ नागरिक ठार झाला. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान येथील ओल्ड मार्केट सर्कलजवळ अपघाताची घटना घडली. जोसेफ बाप्तिस्ता (६७) असे मृताचे नाव आहे. तो मूळ मालभाट येथील असून सध्या तो बड्डे येथे राहात होता, अशी माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली.

उपनिरीक्षक सचिन पाटील पुढील तपास करीत आहेत. याप्रकरणी बसचालक शेख इरफान (रा. दवर्ली) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस एका खासगी कंपनीतील लोकांच्या प्रवासासाठी वापरली जाते. रस्ता ओलांडताना अचानक पुढून वाहने येत असल्याचे बघून जोसेफ गांगरला. तो परत माघारी येऊ लागला असता, त्याला समोरून येणाऱ्या बसने धडक दिली.

रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT