मडगाव: संत फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीविरोधातील आंदोलनप्रकरणी २८ संशयितांपैकी आठजणांनी आज मडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रत्येकी १० हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड सादर केला. न्यायालयाने पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी निश्चित केली.
या प्रकरणातील एक संशयित अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, श्रद्धास्थानाचा पुन्हा अवमान करण्याचे धाडस कोणी करू नये, अन्यथा गप्प बसणार नाही. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या २८ जणांवर गुन्हे दाखल करून सरकार राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्य संशयित मोकळे फिरत असताना आंदोलकांना लक्ष्य केले जात आहे. आणखी १४५ जणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचा दावाही कुतिन्हो यांनी केला.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
श्रद्धास्थानाचा अवमान झाल्यास त्याविरोधात आवाज उठवत राहू. या प्रकरणात स्थानिक नागरिक, महिला आणि सरपंचांनाही गोवण्यात येत असल्याचा आरोप प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा गैरवापर न करता आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.