Manoj Parab vs Viresh Borkar: बिल्डरांशी संबंध, पक्षनिधीवरुन रणकंदन, 'जय-वीरु'च्या नात्यात मोठा तणाव; परब-बोरकर संघर्षाने जनतेच्या विश्वासाचे 'पानिपत'

revolutionary goans party rift manoj parab viresh borkar: समुद्राच्या लाटांशी झुंज देत किनाऱ्याच्या दिशेने निघालेल्या होडीतील खलाशीच एकमेकांच्या हातातील वल्ही हिसकावू लागले, तर होडी किनाऱ्याला लागणार कशी? गोव्याच्या राजकारणात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाची (आरजी) अवस्था सध्या अशीच झाली आहे.
Manoj Parab vs Viresh Borkar
Manoj Parab vs Viresh BorkarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

समुद्राच्या लाटांशी झुंज देत किनाऱ्याच्या दिशेने निघालेल्या होडीतील खलाशीच एकमेकांच्या हातातील वल्ही हिसकावू लागले, तर होडी किनाऱ्याला लागणार कशी? गोव्याच्या राजकारणात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाची (आरजी) अवस्था सध्या अशीच झाली आहे. वर्चस्वाच्या संघर्षात स्वकीयांच्याच बाणांनी घायाळ झालेले मनोज परब काही महिन्यांपूर्वी राजकारणापासून दूर गेले. निवडणुकीआधी पक्षाची पडझड सावरण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरलेत.

त्यांच्या पुनरागमनाने आरजीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. मात्र, रविवारी गोव्याने (Goa) पाहिले ते पक्षाचे पुनरुज्जीवन नव्हते; दोन नेत्यांमधील संघर्षाचे नवे पर्व होते! एकेकाळी शोलेतील ‘जय-वीरू’प्रमाणे वाटचाल करणारे वीरेश - मनोज आज एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. बोरकरांनी परबांवर वैयक्तिक आरोप केले, परबांनी सांत आंद्रेत जाऊन त्यांना उघडे पाडण्याचे आव्हान दिलेय. बिल्डरांशी संबंध, पक्षनिधी, आंदोलनातील भूमिका असे मुद्दे आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Manoj Parab vs Viresh Borkar
Manoj Parab vs Viresh Borkar: "सांत आंद्रेत जाऊन बोरकरांना उघडे पाडू"; मनोज परब यांची आरजीमध्ये जोरदार एन्ट्री; ‘सेटिंगबाज’च्या आरोपावरुन हल्लाबोल

आरजीतील या संघर्षामुळे सत्ताधारी मनातून सुखावले असतील तर आश्चर्य वाटायला नको. विरोधकांनी एकमेकांना लक्ष्य करण्यात वेळ घालवला की सत्ताधाऱ्यांचे काम आपोआप सोपे होते. बोरकर-परब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. जनतेने या घडामोडींतून नेमका कोणता बोध घ्यायचा? राष्ट्रीय राजकारणात समाजवादी पक्षातील मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांच्यातील सत्तासंघर्षाने संघटनेला हादरा दिला. महाराष्ट्रात शिवसेनेतील फूट आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरून झालेला संघर्षही देशाने पाहिला. नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा संघटनेपेक्षा मोठी ठरली की त्याची किंमत कार्यकर्त्यांना मोजावी लागते. आरजीसमोरही आता असाच पेच उभा आहे.

Manoj Parab vs Viresh Borkar
Manoj Parab Rejoin RGP: मनोज परब पुन्हा 'आरजी'च्या मैदानात! 22 नोव्‍हेंबरला पक्षप्रवेश; दोन्‍ही गटांतील संघर्ष आणखी चिघळण्‍याची शक्‍यता

पक्षाचा ताबा कुणाकडे? आगामी निवडणुकीत एबी फॉर्म कोण देणार? काँग्रेससोबत आघाडी झाल्यास अंतिम निर्णय कुणाचा असणार? या प्रश्‍‍नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. बोरकर पक्षावर आपला अधिकार सांगतात, परबही नियंत्रण सोडण्यास तयार नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मिटला नाही तर कार्यकर्त्यांनी कोणाचा आदेश मानायचा? गत निवडणुकीत आरजीने काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला धक्का दिला. त्याचा राजकीय लाभ भाजपला झाला. काँग्रेसची मते विभागण्यात आरजीची भूमिका महत्त्वाची ठरली होती.

Manoj Parab vs Viresh Borkar
Manoj Parab: 'निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत पण हिंमत आहे'; गोवावासीय आम्हाला नक्कीच साथ देतील

त्याच आरजीतील बेदिलीमुळे हातमिळवणी करूनही काँग्रेसला कितपत लाभ होईल, याबाबतही शंका आहे. विरोधकांच्या ओठी आघाडीची भाषा आहे; प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाची दिशा वेगळी आहे. ही स्थिती भाजपच्या पथ्यावरच पडेल. पुढील दोन महिन्यांत बोरकर - गिरीश चोडणकर यांना लक्ष्य करण्याचे संकेत परब यांनी दिलेत. आरजीचा जन्म एका राजकीय पोकळीतून झाला. जनतेने त्याला पर्याय म्हणून स्वीकारले. त्या विश्वासाचे पानीपत होतेय. पक्षाचा झेंडा कुणाच्या हाती राहणार, यापेक्षा तो गोव्याच्या हितासाठी किती ठामपणे फडकणार, हे महत्त्वाचे आहे. मतदारांना नेत्यांची कुस्ती पाहायची नाही. त्यांना आपल्या समस्‍या सोडविण्‍यासाठी लढणारा विश्वासार्ह आवाज हवा आहे. आरजीला या अपेक्षेचे भान उरले आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.