Curti Khandepar Gram Sabha: खुल्या जागा बळकावणाऱ्या बिल्डरांचा करेक्ट कार्यक्रम होणार? कुर्टी-खांडेपार ग्रामसभेत कारवाईचा इशारा; एकमताने ठराव संमत

curti khandepar gram sabha open spaces encroachment: कुर्टीत रहिवासी संकुलातील खुल्या जागा बळकावण्याचे प्रकार घडले असून या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेत झाला. या विषयावर गरमागरम चर्चा झाली.
curti khandepar gram sabha open spaces encroachment:
curti khandepar gram sabha open spaces encroachment:ai generator image
Published on: 
Updated on: 

फोंडा: कुर्टीत रहिवासी संकुलातील खुल्या जागा बळकावण्याचे प्रकार घडले असून या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेत झाला. या विषयावर गरमागरम चर्चा झाली. रविवारी खांडेपार येथे पंचायतीच्या कार्यालयात ही ग्रामसभा झाली. सरपंच मनिष नाईक यांनी स्वागत केले. पंचायत सचिव सचिन नाईक यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला आणि प्रश्‍नोत्तराला प्रारंभ झाला.

कुर्टी भागातील विविध रहिवासी संकुलातील खुल्या जागा बळकावण्याचे प्रकार घडले आहेत. खुद्द काही बिल्डरांनी अशा जागा ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले आहे, तर काहीजणांनी अशा जागा ताब्यात घेऊन ठेवल्या आहेत. या जागा पुन्हा ताब्यात घेऊन त्यांचा सार्वजनिक स्तरावर विकास करण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला. या खुल्या जागा बळकावलेल्यांनी त्या त्वरित सोडाव्यात अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही पंचायतीतर्फे देण्यात आला.

curti khandepar gram sabha open spaces encroachment:
Curti Accident: कुर्टी येथे भीषण अपघात! फ्लायओव्हरवरील उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार जखमी

कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रात कचरा साठवून ठेवण्यासाठी काही जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. अशा जागांवर कचरा आणून ठेवल्यानंतर तो वाहनातून भरून कचरा प्रकल्पात नेला जातो. मात्र, अशा जागांना बॅरिकेडस् किंवा संरक्षक गेट नसल्याने भटकी गुरे आणि कुत्री हा ओला कचरा सर्वत्र करतात, असे सांगण्यात आले.

curti khandepar gram sabha open spaces encroachment:
Dengue Cases In Curti: डेंग्यूचे कुर्टीत आक्रमण! फोंड्यात 20 रुग्ण सापडले, आरोग्य खात्याकडून स्वच्छता व फॉगिंग मोहिमेची तयारी

बाबल्याखळीत गटारांवर बांधकामे!

कुर्टी भागातील बाबल्याखळी परिसरात गटारांवर बांधकामे करण्यात आली असून काही गटारात तर सांडपाणी आणि मलमूत्र सोडण्याचे प्रकारही घडले असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात अस्वच्छता तसेच गटारे तुंबली असून घाण वास परिसरात असल्याने सगळीकडे ओंगळवाणी परिस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी या भागात पाहणी करण्यात येणार असून गटारांवर केलेली बांधकामे जमीनदोस्त करण्याबरोबरच सांडपाणी तसेच मलमूत्र गटारात सोडलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा निर्णयही या ग्रामसभेत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.