Turtle Dainik Gomantak
गोवा

Turtle: आश्वे समुद्र किनारी सागरी कासवाने घातली अंडी

परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

सागरी कासवांनी आश्वे येथील शांत परिसर असलेल्या जमिनीच्या शेजारी किनारी भागात एका कासवाने अंडी घातल्याची माहिती तेथील सुरक्षारक्षकाने वन विभागाला दिली. त्यानंतर त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी गाड यांनी येऊन त्या परिसरात जाळी मारून सुरक्षा देण्यावर भर दिलेला आहे.

राज्यात ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत व्यवस्थापन आणि प्रभावी संवर्धन उपाययोजना करण्यासाठी वन विभाग सक्रिय असल्याचे वन आणि नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी जाहिर केलंय. तसेच मांद्रे समुद्र किनारी कासवाने अंडी दिल्यावर राणे यांनी संपूर्ण मोरजी समुद्र किनारा विकासासाठी निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती होती.

कासव संवर्धन मोहीम १९९७ सालापासून टेम्बवाडा मोरजी परिसरात राबवली जात आहे. त्यामुळे हजारो सागरी कासवांच्या पिल्लाना समुद्रात सोडण्यासाठी वन खाते आणि वन विभागाला 'यश आले आहे. टेम्बवाडा येथे ५०० चौरस मीटर जमीन ही सागरी कासवांच्या अंड्यांच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरक्षित केली आणि त्याच ठिकाणी हंगामी स्वरूपाची अभ्यास केंद्र म्हणून वन विभागाने तंबू उभारलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT