Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शैक्षणिक बदल! राज्यात यंदापासून अकरावी, बारावीचे विभाग रद्द

Goa Education: राज्य सरकारचा निर्णय : कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक विभागांऐवजी आता विषय संच

दैनिक गोमन्तक

Goa Education:

राज्य सरकारने आज घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावी-बारावीसाठीचे विभाग रद्द करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक स्तरावर कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक या विभागांऐवजी आता विषय संच असतील.

यंदा अकरावीतून बारावीत जाणाऱ्यांसाठीही हा बदल लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सायंकाळी उशिरा मंत्रालयात पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, पुढील उच्च शिक्षणासाठीचा प्रवेश हा विषयावर आधारित दिला जातो.

त्यामुळे उच्च माध्यमिक स्तरावर विषयांची निवड करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणारे हे केवळ बारावी उत्तीर्ण असतील. ते बारावी कला, बारावी वाणिज्य, बारावी विज्ञान किंवा बारावी व्यावसायिक, असे नसतील.

जूनमध्ये निवडता येणार विषय

यंदा जूनमध्ये दिल्या जाणाऱ्या अकरावी आणि बारावी प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांना विषय संच निवडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांना आपले उच्च शिक्षण कोणत्या विषयात पुढे न्यायचे आहे, तो विषय त्यांना प्रमुख म्हणून घेता येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये तशी तरतूद असून राज्य सरकारने ती यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू करण्याचे ठरविले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

Dog Attack: बोगमाळोत कुत्र्याने घेतला पादचाऱ्याचा चावा, रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Parra: 'आमच्यावरील गुन्हे मागे घ्या'! भूमिका, साखळेश्वर देवस्थान वाद; पर्येतील शेकडो नागरिकांची पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT