minister shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik: शिक्षण ही विकासाची गुरुकिल्ली : मंत्री नाईक

Shripad Naik on Education: वैश्य मंडळातर्फे विजेत्यांना पारितोषिक वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

Shripad Naik on Education: म्हापसा शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली असून, समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणसंस्था सुरू करण्याचे काम त्यावेळी वैश्य मंडळाच्या सदस्यांनी केले.

पोर्तुगिजांशी संघर्ष करीत आपल्या असीम त्यागातून ज्ञानप्रसारक मंडळ ही शिक्षणसंस्था स्थापन केली.

आज या संस्थेत केजी ते ‘पीजी’पर्यंत सुमारे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेताहेत. शंभर वर्षे संस्था चालवणे सोपे काम नाही. वैश्य मंडळाचा समाज धुरीणांची प्रशंसा केलीच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

शतक महोत्सवाप्रीत्यर्थ आयोजिलेल्या पाककला स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धांतील पहिल्या तीन विजेत्यांना तसेच नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

आसगाव येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या श्रीमती रुक्मिणी पोकळे स्मृती सभागृहात शनिवारी (ता.१८) आयोजित कार्यक्रमात वैश्यमंडळाच्या शतकोत्सव समारंभात ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते.

व्यासपीठावर ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे, वैश्यमंडळाचे अध्यक्ष अभय गवंडळकर, सचिव महेश फळारी, खजिनदार यशवंत गवंडळकर, शिवानंद धावजेकर, अखिल भारतीय वैश्यमंडळाचे सचिव मोतीचंद म्हापसेकर व महिला संघटनेच्या किरण नाटेकर या उपस्थित होत्या.

वैश्यमंडळाच्या महिलांनी स्वागतगीत सादर केल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

वैश्यमंडळाचे अध्यक्ष अभय गवंडळकर यांनी स्वागत केले. ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे यांनी मंडळ स्थापनेची ऐतिहासिक माहिती दिली. सचिव महेश फळारी यांनी अहवाल सादर केला.

या शतकी महोत्सवात वैश्यमंडळासाठी योगदान दिलेल्या माजी अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्‍यांचा तसेच कर्मचाऱ्‍यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांचा सन्मान अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन राजाराम नार्वेकर व शीतल पावसकर यांनी केले. तर यशवंत गवंडळकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'तो' शेवटचा चेंडू ठरला आयुष्यातील अंतिम क्षण; हृदयविकाराच्या झटक्याने गोलंदाजाचा मैदानावरच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Ranji Trophy: गोवा संघाशी भिडणार IPLचा शतकवीर; पर्वरीत रंगणार सामना; रणजी सामन्यात चंदीगडचे आव्हान

Mayem Lake: ‘या...या, मया या’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या तलावाकडे पर्यटकांची पाठ! 10 कोटींचा खर्च पाण्‍यात; बससेवासुद्धा बासनात

बिष्णोई गँगची माणसं आहे! दारूच्या नशेत तंगाट पर्यटकांचा कळंगुट येथील हॉटेलमध्ये राडा; पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

Kadamba Bus: याचिकेने आणली ‘कदंब’ला जाग! आसगाव–म्हापसा मार्गावर अतिरिक्त बस सुरू; सुनावणीनंतर उचलले पाऊल

SCROLL FOR NEXT