ED Dainik Gomantak
गोवा

ED Takes Over Probe Into Salgaocars: चार हजार कोटींचे कथित विदेशी चलन उल्लंघन; गोव्यातील साळगावकर कुटुंबाची चौकशी आता ED करणार

साळगावकर कुटुंबाची परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) तरतुदींनुसार परदेशातील व्यवहारांबाबत चौकशी केली जात आहे.

Pramod Yadav

ED to Probe goa's Salgaocar Family For FEMA Violations: गोव्यातील साळगावकर कुटुंबाकडून चार हजार कोटी रुपयांच्या कथित विदेशी चलन उल्लंघनाची चौकशी आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हाती घेतली आहे. यापूर्वी आयकर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात होती.

साळगावकर कुटुंबातील पाचही सदस्य लक्ष्मी साळगावकर आणि त्यांची मुलं समीर, चंदना, पोर्णिमा आणि अर्जुन यांची परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) तरतुदींनुसार परदेशातील व्यवहारांबाबत चौकशी केली जात आहे.

काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) कायद्यांतर्गत आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत होते. पण, साळगावकर कुटुंब सिंगापूरमध्ये असल्याने या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपविण्यात आला आहे.

आयकर विभागाने कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी ₹490 कोटींच्या कर मागणीची नोटीस बजावली आहे.

2021 पासून कुटुंबाला पाच नोटिसा बजावल्या आहेत. तसेच, त्यांना तपासात सहकार्य करण्याचे आणि कराची देय रक्कम भरण्यास सांगितले आहे.

साळगावकर कुटुंबाने थकबाकी न भरल्यास, काळा पैसा कायद्यांतर्गत वसुलीचा पर्याय उपलब्ध आहे.

पॅंडोरा पेपर्समधील संबधावरून ईडीने ही चौकशी हाती घेतली आहे. साळगावकर बंधूंनी ऑफशोअर ट्रस्ट आणि फर्म स्थापन केल्या होत्या.

टॅक्स हेवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स (BVI) येथे विविध कंपन्या स्थापन केल्याबद्दल दिवंगत अनिल साळगावकर यांचे Pandora Papers मध्ये नाव आहे.

दरम्यान, ईडीने गेल्या महिन्यात रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्या 800 कोटी रुपयांच्या ऑफशोअर संपत्तीप्रकरणी चौकशी केली होती.

कथित फॉरेक्स उल्लंघन आणि पॅंडोरा पेपर्स प्रकरणाशी संबंधित ही चौकशी होती. अंबानी यांच्या ब्रिटिश व्हर्जिन आयलंड (BVI), जर्सी आणि सायप्रसमध्ये सुमारे डझनभर ऑफशोर कंपन्या आहेत.

2007 ते 2008 दरम्यान या कंपन्यांची स्थापना करण्यात आली होती आणि त्यांनी कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर थेट विदेशी गुंतवणूक म्हणून ही कर्जे भारतात आणली गेली. असा आरोप केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT