Goa Assembly 2023: राज्यातील 'निकृष्ट रस्ते, वाहतूक कोंडी' प्रश्न जैसे थे; सरकारच्या 'त्या' केवळ घोषणाच!- बोरकर

वीरेश बोरकर यांची ‘साबांखा’च्या कामावर टीकेची झोड ः पेडणे-काणकोण महामार्गाचे काम निकृष्ट
MLA Viresh Borkar
MLA Viresh BorkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session: एक नोव्हेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती याची आठवण सांगत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामावर सांतआंद्रे आमदार वीरेश बोरकर यांनी टीका केली.

पेडणे ते काणकोण महामार्गाचे काम व्यवस्थित झालेले नाही, आता वाहनधारकच या कामात नेटकेपणा नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. खराब रस्त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहेत की नाही, असा सवाल त्यांनी केला.

कला अकादमीच्या कामाविषयी श्वेतपत्रिका कधी येणार आहे. जुंता हाऊसची स्थिती फारच बिकट आहे, त्या इमारतीत असणाऱ्या सुविधा सोडविण्यासाठी संबंधित काहीच करीत नसल्याचे दिसते.

MLA Viresh Borkar
Bondla Wildlife Sanctuary : बोंडला प्राणिसंग्रहालयाची परिस्थिती बिकट- वनमंत्र्यांची कबुली

नावेली मतदारसंघातील दवर्ली येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची गरज आहे. रावणफोंड येथे लष्करी तळ आहे. भरती व इतर प्रक्रियेसाठी हजारो विद्यार्थी तेथे येतात, त्यांच्यासाठी शौचालयाची कायमस्वरुपी सोय करून द्यावी.

नावेली चर्चसमोर वाहतूक कोंडी होते. काही कारणाने बाणावली बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. रावणफोंड ते नावेली हा शॉर्टकटचा रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे.

-उल्हास तुयेकर, आमदार नावेली

MLA Viresh Borkar
Margao Drugs Case: मडगावात 2.5 लाखांचे ड्रग्ज जप्त, उत्तर प्रदेशातील युवकाला अटक

सांताक्रूझ मतदारसंघात केबल घालण्यासाठी मशिनद्वारे रस्ते कापून ते काम करावेत. या मतदारसंघाविषयी नकारार्थी मत झाले आहे, त्यामुळे साबांखा मंत्र्यांनी लक्ष घालून अधिकाधिक कामे करावीत.

मतदारसंघात ६० वर्षीय सिमेंटची जलवाहिनी आहे, ती जलवाहिनी बदलण्यात यावी. रस्ते हॉटमिक्स करण्यापूर्वी जलवाहिनी बदलण्यात यावी, म्हणजे रस्ते फोडण्याचे काम डांबरीकरणानंतर करावे लागणार नाही.

-रुडाल्फ फर्नांडिस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com