लखनऊ: रिएल ईस्टेटमधील घोटाळ्याप्रकरणी लखनऊच्या ईडीने भासीन इन्फोटेक आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, ग्रँड व्हेनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्याशी संबधित मालमत्तेत गुरुवारी (१० एप्रिल) शोध मोहीम राबवली. सक्तवसुली संचालनालयाने विविध कागदपत्रे, बँक लॉकरच्या चाव्या आणि ३० लाख रुपये रक्कम जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग कायदा २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ईडीने भासीन इन्फोटेक आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, ग्रँड व्हेनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संबधित दिल्ली, नोएडा, गोवा येथील नऊ ठिकाणी १० एप्रिल रोजी शोध मोहिम राबवली.
या मोहिमेत ईडीने विविध आक्षेपार्ह माहिती, कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. याशिवाय विविध बँक लॉकरच्या चाव्या आणि ३० लाख रु. रक्कम जप्त करत विविध बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
ग्रँड व्हेनेझिया कमर्शियल कॉम्प्लेक्स या हाय-प्रोफाइल रिअल इस्टेट प्रकल्पातील गुंतवणूकदारांना व्यावसायिक जागा आणि परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली, असा कंपनीवर आरोप करण्यात आला आहे. गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग कायदा २००२ अंतर्गत ईडी कंपनीच्या बँक खात्यावरील व्यवहार तपासात आहे.
घोटाळा समोर आल्यापासून ईडीकडून याप्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. याच तपासाचा भाग म्हणून ईडीने देशातील विविध भागात शोध मोहिम राबवत जप्तीची कारवाई केली. गोव्यासह देशातील विविध भागात रिएल ईस्टेटसंबधित घोटाळे उघडकीस येत आहेत. याप्रकरणात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.