ED Raids Dainik Gomantak
गोवा

ED Raid Goa: गोव्यात ईडीची मोठी कारवाई; इस्टिव्हन डिसोझा यांची 60 कोटींची मालमत्ता जप्त

Enforcement Directorate Goa Action: अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत ही कारवाई केली.

Pramod Yadav

पणजी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) इस्टिव्हन डिसोझा आणि इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात ६०.०५ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या मालमत्ता इस्टिव्हन डिसोझा यांच्या आजी रोझा मारिया डिसोझा यांच्या नावावर आहेत.

तपास यंत्रणेने केलेली ही जप्ती ८ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या पूर्वीच्या तात्पुरत्या जप्तीच्या आदेशाव्यतिरिक्त आहे, ज्या अंतर्गत ११.८२ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

ईडीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये गोव्यातील बार्देश तालुक्यातील पिळर्ण गावातील जमिनीचा समावेश आहे. या जमिनीचा विक्री करार आणि प्रतिज्ञापत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) बेकायदेशीरपणे मिळवले गेले होते.

गोवा पोलिसांनी इस्टिव्हन डिसोझा आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० च्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून मालमत्तेचे बेकायदेशीर हस्तांतरण करणे आणि फसवणूक करणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होता.

इस्टिव्हन डिसोझा यांनी मोहम्मद सुहेल आणि इतरांसह या कथित जमीन घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका होती, असे ईडीच्या तपासात दिसून आले आहे. बनावट कागदपत्रे तयार करून आणि विक्री करारांसह जमिनीशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार करून अनेक मालमत्ता फसव्या पद्धतीने मिळवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT