Arvind Kejriwal Arrest Dainik Gomantak
गोवा

Delhi Liquor Scam: केजरीवाल यांची अटक कायदेशीर; गोवा निवडणुकीतील मनी ट्रेलबाबत ED कडे भरपूर पुरावे

Delhi Liquor Scam:कथित दारू घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या अटक आणि रिमांडला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते.

Pramod Yadav

Delhi Liquor Scam

दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची अटक कायदेशीर ठरवली आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या अटक आणि रिमांडला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते.

या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर नसून, ईडीने पुरेसे पुरावे दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाने ईडीचा रिमांड कायदेशीर असल्याचे घोषित करत, तपासाची प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार आरोपीचा असू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाने गोवा निवडणुकीशी संबंधित मनी ट्रेलचाही उल्लेख केला. याप्रकरणी ईडीने पुरेसे पुरावे दिले आहेत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आम आदमी पक्षाच्या गोव्यातील उमेदवारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, यात त्यांनी पैशाचा मुद्दा मान्य केला आहे. उच्च न्यायालयाने एनडी गुप्ता आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला.

ईडीकडे भरपूर पुरावे आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. गोवा निवडणुकीत खर्चासाठी पैसे दिल्याचे मान्य केले, त्यात हवाला डीलर्सची विधाने, मंजूर करणाऱ्यांची विधाने आहेत, याशिवाय आम आदमी पार्टीच्या सदस्यांची विधानेही आहेत.

केजरीवाल यांची अटकेत कायद्याचे उल्लंघन झालेले नाही तसेच कोठडी बेकायदेशीर देखील म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT