Eco-friendly Lord Ganesha idols ahead of Ganesh Festival Dainik Gomantak
गोवा

Ganesh Festival 2023 फोंड्यात प्लास्टर ऑफ पॅरिसला फाटा शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध

चित्रशाळांमध्ये लगबग : मंगेशीतील मूर्तीकार विजय वेंगुर्लेकर यांचे कलाकाम

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा सण जवळ येत चालला असून राज्यात हळूहळू वातावरण निर्मिती होत आहे. विशेष म्हणजे यावेळेला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना फाटा देत पर्यावरणपूरक अशा चिकण मातीच्या व काही ठिकाणी शाडू मातीच्या गणेशमूर्ती भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

राज्यातील विविध दुकानांत चतुर्थीसाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल सुरू झाली आहे, त्याचबरोबर गणेश चित्रशाळांत मूर्ती रंगविण्यासाठी लगबग वाढली.

अनुदान वाढण्याची शक्यता

राज्य सरकारच्या हस्तकला महामंडळातर्फे गणेश मूर्तीकारांना अनुदान देण्यात येते. मूर्तीकारांना सोयिस्कर व्हावे तसेच गणेशभक्तांनाही योग्य दरात या मूर्ती उपलब्ध व्हाव्यात यासाठी अशाप्रकारचे अनुदान दरवर्षी देण्यात येत असून यंदा या अनुदानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसला फाटा

राज्यात सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी असल्याने अनेक चित्रशाळांत चिकण माती तसेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेषतः चिकण मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून सुरेख रंगरंगोटी व इतर साहित्यामुळे या मूर्ती खुलून दिसत आहेत.

भाविकांची वाढतेय गर्दी

फोंडा शहर परिसरात तिस्क - फोंडा, वरचा बाजार, खडपाबांध परिसर तसेच इतर ठिकाणी गणेश मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाहताच लक्ष वेधून घेणाऱ्या या सुबक सुंदर गणेश मूर्ती रंगरंगोटीमुळे अधिकच खुलून दिसत असून भाविकांची गर्दीही या गणेशमूर्ती पाहण्यासाठी वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT