E-vehicle grant fund dainik gomantak
गोवा

Goa News : ई-वाहन अनुदान निधीसाठी आतापर्यंत 1845 अर्ज प्राप्त

छाननी प्रक्रिया सुरू : ३३५ चारचाकी, १५०० दुचाकींसाठी अर्ज

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गोवा सरकारच्या ई-वाहन (इलेक्ट्रिक) अनुदान निधीसाठी आतापर्यंत सुमारे १८४५ अर्ज मिळाले आहेत. यात ३३५ चारचाकी, १५०० दुचाकी आणि १० तीनचाकी वाहनांचा समावेश आहे सरकारने यावर्षी ३१ जुलै रोजी अनुदान बंद केली होती, तत्पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांचे अजूनही अर्ज येत असून बारकाईने त्यांची छाननी प्रक्रिया केली जात असल्याने ही पूर्ण व्हायला थोडा विलंब होणार आहे, अशी माहिती गोवा ऊर्जा विकास संस्थने (गेडा) दै.‘गोमन्तक’ला दिली आहे.

ई-वाहन खरेदी करणाऱ्यांना केंद्र सरकारच्या अनुदानासोबत गोव्यात हरित क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनेदेखील अनुदान निधी देण्याचा निर्णय घेतला होता. पण ३१ जुलैला योजना संपुष्टात आणण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत ३०० चारचाकी व ३ हजार दुचाकी वाहनांना निधी दिला जाणार आहे.

३०० चारचाकी, ३ हजार दुचाकींना देणार निधी

  • ०३ लाख रुपयांपर्यंतचारचाकी वाहनांना निधी मिळणार आहे.

  • ३० हजार रुपयांपर्यंत दुचाकींसाठी निधी

  • ६० हजार रुपयांपर्यंत तीनचाकींसाठी मर्यादा निश्‍चित

बॅटरी क्षमतेनुसार अनुदान

योजना अधिसूचित होण्यापूर्वी आणि संपुष्टात आलेल्या काळाच्या दरम्यानच्या वाहनांना निधी मिळणार आहे, असे गेडाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चारचाकी वाहनांना ३ लाखांपर्यंत, दुचाकींसाठी ३० हजारपर्यंत आणि तीनचाकींसाठी ६० हजार मर्यादा निश्‍चित केली आहे.

अनुदानासाठी आलेल्या अर्जाच्या प्रक्रियेत रहिवासी दाखला अनिवार्य आहे. मात्र, काही अर्जांतील दाखल्यात त्रुटी आढळल्याने बारकाईने अर्जांची छाननी केली जात आहे. अर्जांच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही.

- संजीव जोगळेकर,सदस्य सचिव, गेडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT