E Sakal No 1 Marathi Website Dainik Gomantak
गोवा

E Sakal: डिजिटल युगाची पहाट! देशातील नंबर 1 मराठी वेबसाईट 'ई-सकाळ'

No 1 Marathi News Media Site in Maharashtra: नव्या पिढीसाठी अधिक सशक्त आणि माहितीपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याचा ई-सकाळचा संकल्प आहे.

Sameer Panditrao

पुणे: ई-सकाळने डिजिटल पत्रकारितेतील महत्त्वाचा टप्पा पार करत २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रदीर्घ वाटचालीत, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आणि विश्वासार्ह बातम्या देत ई-सकाळ लाखो वाचकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा २५ वर्षांचा टप्पा पूर्ण करत असताना ई - सकाळने आणखी एक खास तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे.

ही आनंदाची बातमी म्हणजे कॉमस्कोर रेटिंगमध्ये ई सकाळ भारतातील क्रमांक एकची मराठी वेबसाइट बनली आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर मराठी भाषेच्या डिजिटल सशक्तीकरणाची ही मोठी सिद्धी आहे.

राजकारण, अर्थकारण, क्रीडा, मनोरंजन, शेती आणि आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांतील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी वाचक ई -सकाळवर नियमितपणे भेट देत असल्याची ही खात्रीलायक, आनंदाची बातमी आहे.

या प्रवासात वाचकांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच e-सकाळ आज या उंचीवर पोहोचले आहे. आगामी काळातही नव्या पिढीसाठी अधिक सशक्त आणि माहितीपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याचा ई-सकाळचा संकल्प आहे.

कॉमस्कोर म्हणजे काय?

कॉमस्कोर ही एक आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्था आहे जी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाचकसंख्या आणि लोकप्रियता मोजते. ही संस्था वेबसाईट्स, मोबाइल अॅप्स आणि ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्मच्या ट्रॅफिकचा अभ्यास करून त्यांचे रँकिंग निश्चित करते. भारतात डिजिटल माध्यमांचे संख्यात्मक मूल्यमापन करण्यासाठी कॉमस्कोर डेटा महत्त्वाचा मानला जातो.

ई-सकाळने डिजिटल माध्यमात कॉमस्कोरसारख्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर पोहोचत त्यांनी आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळेच हे यश शक्य झाले असून, डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळने आपली वेगळी छाप उमटवली आहे

कॉमस्कोरचा अहवाल

१) सकाळ (१३.५ दशलक्ष)

२) लोकमत (११ दशलक्ष)

३) लोकसत्ता (६.८ दशलक्ष)

४) टीव्ही ९ मराठी (७.४ दशलक्ष)

५) आणि एबीपी माझा (७.२ दशलक्ष)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT