Mormugao Dainik Gomantak
गोवा

Mormugao: मुरगाव तालुक्यात दत्त जयंती उत्साहात; महाप्रसादाने उत्सवाची सांगता

''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा''

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रेय जयंती मुरगाव तालुक्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण होते. तसेच तालुक्यात सर्वत्र दुपारनंतर महाप्रसादाचे आयोजन करत या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

(Dutt Jayanti was celebrated in Mormugao taluka in a devotional atmosphere)

आज बुधवारी ( दि. 7 ) रोजी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात आला. पहाटेपासून विविध ठीकाणी मंदिरात खास करून श्री साई व श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक विधी सुरू झाल्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नाद प्रत्येक मंदिरात पहाटेपासून ऐकू येत होता. सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले. तर दुपारी आरती व तीर्थ प्रसादाचा कार्यक्रम झाला.

Mormugao

वास्कोतील गोवा शिपयार्ड समोरील श्री दत्त साई मंदिरात, टॅक्सी स्टँण्डकडील साई मंदिरात हेडलॅण्ड सडा येथील साई मंदिरात, नवेवाडे, उपासनगर, बोगमाळो येथील साई मंदिरात, ओरुले दत्तवाडी संस्थानात, बोगमाळो गाळींत येथील दत्त मंदिरात जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आली. बहुतेक ठिकाणी भाविकांसाठी दुपारी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. याचा शेकडो भाविकांनी लाभ घेता

दरम्यान संध्याकाळच्या सत्रात दत्त जन्म पाळणा झाला. याप्रसंगी भाविकांनी उपस्थिती लावून दत्त जन्म सोहळा साजरा केला. नंतर आरती व तीर्थ प्रसाद झाला. तसेच प्रत्येक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम व काही ठिकाणी रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली व शेवटी आरती व तीर्थ प्रसाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT