cyclonic storm in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात धुळीचे लोट उठल्याने उडाला गोंधळ

म्हापशासह ताळगावातही वेगवान वाऱ्यांमुळे धूळ, दृष्यमानताही झाली कमी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात आसानी चक्रीवादळामुळे आधीच ढगाळ वातावरण गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. यातच म्हापसा आणि पणजी परिसरात काही ठिकाणी धुळीचे मोठमोठे लोट उठल्याचं चित्र होतं. म्हापशातील बोडगेश्वर मैदानात आणि तालगावातील चर्च परिसरातही वेगवान वाऱ्यामुळे धुळीचे लोट उडाले.

बंगालच्या उपसागरात आलेल्या आसानी चक्रीवादळामुळे (Cyclone) महाराष्ट्रासह गोव्याच्या काही भागात 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहात आहेत. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी काहीकाळ गोव्यात अनेक ठिकाणी धुळीचे लोट उडाले. जवळपास 10-15 मिनिटे धुळीच्या वादळाचा खेळ सुरु होता. म्हापशातील बोडगेश्वर मैदान आणि ताळगावातील चर्च परिसरात धुळीचे लोट उठल्याने काही काळ दृष्यमानताही कमी झाली होती.

पावसाच्या (Rain) दिवसात अशाप्रकारची वादळं होत असतात. मात्र काही लोकांनी याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आणि नेटकऱ्यांनी वादळ पाहून आश्चर्य व्यक्त केलं. वाऱ्यासह धुळीचे लोट आणि वाळूचे कणही हवेत पसरल्याने काही काळ परिसरात गोंधळ उडाला होता. दरम्यान डिचोली आणि सत्तरी परिसरातही सकाळपासूनच ढगाळ वातावरण (Climate) पाहायला मिळालं. मात्र शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्याची माहिती आहे. म्हापशात 2.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT