Durgesh Gaonkar | National Mallakhamb Association President
Durgesh Gaonkar | National Mallakhamb Association President Dainik Gomantak
गोवा

Goa Sports : पैंगीणचे क्रीडा शिक्षक बनले भारतीय मल्लखांब महासंघाचे अध्यक्ष

सुभाष महाले

Goa Sports : पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दुर्गेश गावकर यांची भारतीय मल्लखांब महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मल्लखांब महासंघाचे अध्यक्ष बनणारे गावकर पहिले गोमंतकीय आहेत. यापूर्वी त्यांनी महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून भरीव काम केले आहे, त्याचसाठी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

महासंघाच्या दिल्ली येथे झालेल्या आमसभेत ही निवड करण्यात आली. सभेला पंचवीस राज्यातील पंचवीस प्रतिनिधी उपस्थित होते. मल्लखांब क्रीडा प्रकाराचे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचे मोठे आव्हान नव्या अध्यक्षासमोर आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष गावकर यांनी सांगितले. क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी काणकोण तालुक्यात मल्लखांब, योगा आणि बुद्धीबळ या क्रीडा प्रकारात विशेष कामगिरी केली आहे.

श्रद्धानंद विद्यालय आणि अन्य शेजारील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लाकडी मल्लखांब आणि रोप मल्लखांब क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना मल्लखांबाचे प्रदर्शन करून पदके पटकावली आहेत. गावकर काणकोण क्रीडा अकादमीचे क्रियाशील सदस्य आहेत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमदार दिगंबर कामत जलतरण महासंघ तर माजी खासदार रमाकांत आंगले हे बेसबॉल महासंघाचे अध्यक्ष बनले होते. पुन्हा एकदा गावकर यांच्या रूपाने मल्लखांब महासंघाचे अध्यक्षपद गोव्याला मिळाले आहे.

दरम्यान गोव्याच्या संध्या पालयेकर यांची यावर्षी ऑगस्टमध्ये भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT