Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: भिंतीवरून मारल्या उड्या, पंचांवर हेल्मेटने हल्ला; दुर्गा-चिंचोणे येथे दिवसाढवळ्या भरवस्तीत घरफोडीचा प्रयत्न

Durga Chinchinim Theft: दुर्गा-चिंचोणे येथील भर लोकवस्तीतील एक बंद घर फोडण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी घडला. शेजाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर पळून जाणाऱ्या दोघांना पंच गोम्स यांनी पकडण्याचा प्रयत्‍न केला.

Sameer Panditrao

मडगाव: दुर्गा-चिंचोणे येथील भर लोकवस्तीतील एक बंद घर फोडण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी घडला. शेजाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर पळून जाणाऱ्या दोघांना पंच जर्सन गोम्स यांनी पकडण्याचा प्रयत्‍न केला.

मात्र चोरांंनी त्यांच्यावर हेल्मेटने हल्ला करून पळ काढला. या चोरांची छबी सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्‍या आधारे पोलिस चोरांंचा शोध घेत आहेत. दोन अनोळखी व्यक्ती बंद घरात येताना दिसल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेने विचारणा केली असता, त्यांनी संरक्षक भिंतीवरून उड्या मारल्या.

त्‍या महिलेने ही बाब पंच जर्सन गोम्स यांना सांगितली असता त्यांनी आपल्यासोबत आणखी एकाला घेत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांनी हेल्मेटचा जोरदार प्रहार जर्सन यांच्या डोक्यावर केला.

दुचाकीवरून पळणारे चोर सीसीटीव्‍हीत कैद

एका कामगाराने जखमी जर्सन यांच्‍या दिशेने धाव घेताच चोर दुचाकीवरून पळून गेले. माहिती मिळाल्यावर कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जर्सन यांच्यासोबत झालेल्या झटापटीत चोरांचे घटनास्थळी पडलेले हेल्मेट सापडले. गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही संशयित चोरटे कैद झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! GSSC कडून 436 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कसा कराल अर्ज? जाणून घ्या

FDA Raid: नागवा-हडफडेत एफडीएची कारवाई, हुबळीतून आणलेलं 300 किलो चिकन जप्त

Mapusa: म्हापशात अज्ञाताने जाळल्या 6 कचराकुंड्या; पालिकेची पोलिसांत तक्रार

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतं? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

WCL 2025: युवराज सिंग, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल... क्रिकेटचे लीजेंड्स पुन्हा मैदानात; LIVE सामने कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT