Mahanand Naik Goa Dainik Gomantak
गोवा

सोळा खून, बायकोच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या दुपट्टा किलर महानंद नाईकच्या फॅमिलीचे पुढे काय झाले?

महानंदला तर शिक्षा झाली पण, त्याच्या कुटुंबाचे पुढे काय झाले याची माहिती कधीच समोर आली नाही.

Pramod Yadav

Mahanand Naik Goa: गोव्याच्या इतिहासातील सर्वात मोठे हत्याकांड करणारा दुपट्टा किलर महानंद नाईक, मागील आठवड्यात तब्बल 14 वर्षानंतर फर्लो रजेवर कारागृहाच्या बाहेर आला आहे. 1994 रोजी त्याने पहिली हत्या केल्यानंतर पुढील 15 वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता.

2009 मध्ये अटक होईपर्यंत महानंदने तब्बल सोळा हत्या केल्याचे गुन्हे त्याच्याविरोधात नोंद आहेत. बायकोच्या मैत्रिणीवर महानंद नाईकने बलात्कार केल्यानंतर या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढे त्याने दोन खूनांची कबुली दिली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. महानंदला तर शिक्षा झाली पण, त्याच्या कुटुंबाचे पुढे काय झाले याची माहिती कधीच समोर आली नाही.

महानंद एका सामान्य घरातील व्यक्ती होता व रिक्षा चालवून त्याचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. शिरोड्यातील आनंदवाडी, तरवळे येथील रहिवासी महानंदला पत्नी आणि एक मुलगी असल्याचे सांगितले जाते. 2009 साली महानंदच्या दुष्कर्माची माहिती समोर आली, त्यावेळी त्याच्या गावातील संतप्त जमावाने मे महिन्यात त्याच्या घराला आग लावली. या आगीत त्याच्या घराचा मोठा भाग जळून खाली पडला, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, घराला आग लावली त्यावेळी घरात कोणी नव्हते असे स्थानिक सांगतात. महानंदच्या आई-वडिलांबाबत अधिक माहिती मिळाली नाही, मात्र, दोघेही हयात नसल्याचे स्थानिक सांगतात. तसेच, याबाबत अधिक माहिती देण्यासही स्थानिकांनी नकार दिला.

महानंद कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी 'गोमन्तक'कडून संपर्क केला.

'महानंद बाबत मला काहीच माहिती नाही. तो केव्हा बाहेर आला, तो कुठे आहे याबाबत मला काही कल्पना नाही.' मुलगीबाबत विचारले असता, तिला देखील काही माहिती नाही. 'तो आमच्यासाठी कधीच मेला आहे.' अशी प्रतिक्रिया महानंदच्या पत्नीने 'गोमन्तक'शी बोलताना दिली.

महानंदला अटक केल्यानंतर त्याची पत्नी आणि मुलगी (Mahanand Naik Family) परराज्यात राहतात. महानंदच्या पत्नीने अधिक काही माहिती न देता फोन ठेऊन दिला. महानंदच्या पत्नीची फोनवरील शांतता बरेच काही सांगणारी होती.

महानंद 2005 साली रिक्षा व्यवसायातून बाहेर पडला तेव्हापासून तो बेरोजगार होता. दरम्यान, त्याची बायको नृत्य शिकवणी घ्यायची याच माध्यमातून तो फोंड्यातील एका महिलेच्या संपर्कात आला व त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याच प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. असे नाईक प्रकरणाचे तपास अधिकारी सी. एल. पाटील सांगातात.

महानंद सध्या फर्लो (Furlough) रजेवर बाहरे आहे, एक दिवसआड महानंद ओल्ड गोवा पोलिस (Old Goa Police) ठाण्यात हजेर देण्यासाठी हजर राहतो. 14 वर्षानंतर महानंदचा पहिल्यांदाच फोटो समोर आला. निळ्या रंगाची जिन्स आणि हिरव्या रंगाचा शर्ट घालून दोन पोलिसांच्या सोबत उभा राहिलेला महानंदचा फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

महानंदला फर्लो रजा मिळाल्यानंतर काही सामाजिक नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला.

महानंद नाईकला फर्लो मिळण्यासाठी प्रयत्न करणारे पाद्री यांना संपर्क केला त्यांनी महानंदच्या फर्लो आणि उद्देशाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.

'महानंद सुट्टीवर आहे तोवर त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया देणार नाही. तो पुन्हा माघारी जाईल त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देणार,' असे संपर्क केलेल्या एका पाद्रीने गोमन्तक टिव्हीशी बोलताना सांगितले.

दरम्यान, महानंद गुरूवारी संध्याकाळी (दि.15 जून) कोलवाळ कारागृहातून बाहेर आला आहे. 21 दिवसानंतर म्हणजेच 05 जुलै रोजी तो पुन्हा कारागृहात दाखल होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar IIT Project: ‘गोवा विकायला काढलाय’! आयआयटी आंदोलनात काँग्रेसची उडी; विरियातो उठवणार संसदेत आवाज

Goa Live Updates: कोंकणी प्रजेचो आवाज हरपला! बाबली नायक यांचे निधन

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाचे काम 2 महिन्‍यांत सुरू करणार! तवडकरांची हमी; GSIDC कडून प्रक्रिया सुरू

Goa Politics: खरी कुजबुज; व्‍हेंझींना ‘त्‍या’ महिलेचा कळवळा नाही का?

ESG: गोवा मनोरंजन संस्थेचा नवीन गोंधळ! गाजलेल्या ‘जुझे’ फिल्मच्या टीमकडून पुरस्कार परत; वादग्रस्त अहवाल हटवला

SCROLL FOR NEXT